Vivek Agnihotri: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी बॉलिवूडच्या खान मंडळींवर केला हल्लाबोल, म्हणाले....
Vivek Agnihotri (Photo Credit - Twitter)

चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतात आणि अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मते मांडतात. सिनेसृष्टीपासून राजकारणापर्यंत विवेक रंजन अग्निहोत्री आपला मुद्दा ठेवतात आणि कधी त्यांना सोशल मीडिया यूजर्सचा पाठिंबा मिळतो, तर कधी ट्रोल होतात दरम्यान, विवेक रंजन अग्निहोत्रीने बॉलिवूडच्या खान (Bollywood Khans) कलाकारांना टोला लगावला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता याबाबत एक ट्विट केले आहे. लोकांना आता या अभिनेत्यांच्या चित्रपटात रस नसून, चांगल्या कथांमध्ये रस असल्याचे मत व्यक्त केले आहे. मागील काही काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘द कश्मीर फाइल्स’ हा एकमेव बॉलिवूड चित्रपट आहे ज्याने IMDb च्या लोकप्रिय टॉप 5 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चित्रपटाचे उदाहरण घेत त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. दिग्दर्शकाने दोन्ही अभिनेत्यांची नावे न घेता बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण सांगितले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्विट करत लिहिले की, 'जोपर्यंत हे किंग, बादशाह आणि सुलतान बॉलीवूडमध्ये राहतील, तोपर्यंत हिंदी सिनेमा बुडत राहील. लोकांच्या कथेच्या सहाय्याने जर तुम्ही याला लोकांचा उद्योग बनवला तरच तो जागतिक चित्रपट उद्योगाचे नेतृत्व करू शकेल. ही वस्तुस्थिती आहे. (हे देखील वाचा: Nitu Chandra: 'माझी पत्नी हो, मी दर महिन्याला 25 लाख रुपये देईन' व्यावसायिकाने अभिनेत्रीला दिली होती ऑफर)

Tweet

विवेक अग्निहोत्री अधिक सक्रिय 

काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भक्कम पाठिंबा मिळाल्याचे आठवते. कमकुवत सुरुवातीनंतर, चित्रपटाला माउथ पब्लिसिटीचा फायदा मिळाला आणि लोकांच्या भावनांशी जोडल्यानंतर हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाला समीक्षक आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. द काश्मीर फाइल्सच्या यशानंतर, विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाले आहे आणि जवळजवळ प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडतात.