अभिनेत्री अनुष्का शर्मा ने शेअर केलेले बालपणीनचे फोटो पाहून विराट कोहली झाला थक्क, फोटोंना दिली अशी Cute कमेंट
Anushka Sharma (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड आणि क्रिडा विश्वात चर्चेत असणारे जोडपं म्हणजे विरुष्काचे (Virushka). क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोशल मिडियावर खूपच लोकप्रिय आहे. त्यामुळे या गोड जोडीच्या हनिमूनच्या, पार्ट्यांच्या, व्हेकेशनच्या चर्चा या चाहत्यांमध्ये होतच असतात. त्यातच विरुष्का सोशल मिडियावरही सक्रिय असल्याने चाहतेही आनंदून जातात. सध्या अनुष्का ने आपल्या सोशल मिडियावर आपल्या बालपणीचे फोटो शेअर केले आहे. हे फोटो पाहून तिचे चाहते तर घायाळ झालेच आहेत पण सर्वात या फोटोंने जो अक्षरश: वेडा झालाय तो म्हणजे तिचा नवरोबा विराट कोहली.. आपल्या बायकोचे लहानपणीचे क्यूट फोटो बघून त्यावर त्याचे कमेंट्स पाहून चाहत्यांमध्येही या जोडप्याची चर्चा रंगू लागली आहे.

अनुष्काचे लहानपणीचे फोटो पाहून अनुष्का जितकी आता सुंदर दिसते तितकीच सुंदर ती लहानपणीही दिसत होती असे तिचे चाहते म्हणत आहेत.

 

View this post on Instagram

 

लिटिल मी

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

हेदेखील वाचा- विराट कोहली याने शेअर केला पत्नी अनुष्का शर्मा सोबतचा Hot फोटो, चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

लिटिल मी

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

View this post on Instagram

 

लिटिल मी

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

तर तिचे फोटो पाहून विराट तू खूपच गोड दिसत असून तुझे डोळे खूपच सुंदर आहेत असं विराट म्हणाला. तर अभिनेत्री दिया मिर्झानेही So Sweet अशी कमेंट दिली आहे. अनुष्का सध्या सिनेमांपासून थोडी लांब आहे. मात्र आता लवकरच ती वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.