Vilasrao Deshmukh Death Anniversary: रितेश देशमुख ची वडील विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनी खास पोस्ट, Miss You Pappa म्हणत शेअर केला 'हा' फोटो
Riteish Deshmukh Post On Vilasrao Deshmukh Death Anniversary (Photo Credits: File Image)

Vilasrao Deshmukh 8th Death Anniversary: काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज 8 वी पुण्यतिथी आहे. गावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री हा त्यांंचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरतो, आपल्या कामासोबतच विलासराव यांंच्या हसर्‍या व्यक्तीमत्वाने त्यांची एक वेगळी ओळख बनवली होती. साधारणतः धीर गंभीर चेहरा करुन फिरणार्‍या राजकारण्यांंमध्ये विलासराव यांचे निखळ हासु वेगळे ठरायचे. आज त्यांंच्या 8व्या स्मृतीदिनी विलासरावांचे धाकटे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने याच हसर्‍या स्वभावावरुन वडिलांंची आठवण काढत एक पोस्ट केली आहे. लोकांतील, लोकांचा, लोकनेता असे म्हणत वडिलांची आठवण काढत रितेश ने विलासराव यांंचे एक सुंदर कॅरिकेचर शेअर केले आहे, ज्याला कॅप्शन देताना, तुमच्या हास्याने जग बदला पण जगाला तुमचंं हासु बदलु देउ नका असा सल्ला रितेश देतोय.

रितेश प्रमाणेच विलासराव यांचे थोरले पुत्र आणि आमदार धीरज देशमुख यांनी सुद्धा एका व्हिडीओ मधुन वडिलांंच्या आठवणी शेअर केल्या आहेत. यापुर्वी रितेशने विलासराव देशमुख यांच्या जयंंती निमित्त त्यांच्यासारखाच पोशाख करुन एक अत्यंत भावनिक व्हिडीओ पोस्ट केला होता.

रितेश देशमुख ट्विट

धीरज देशमुख ट्विट

विलासराव देशमुख यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी होउन त्यांना यकृताचा कर्करोग (हेप्टोसेल्युलर कार्सिनोमा) झाला होता, यामुळे चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये 14 ऑगस्ट 2012  रोजी त्यांचे निधन झाले होते.