विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त मुलगा रितेश ने वडिलांच्या पोशाखासह केले असे काही जे पाहून डोळ्यांच्या कडा ओलावतील, पाहा भावूक व्हिडिओ
या टिकटॉक व्हिडिओमध्ये रितेश आपल्या वडिलांच्या पोशाखामध्ये हात घाऊन तो हात आपल्या डोक्यावरून फिरवत आहे. जणू या पोशाखातून स्वत: विलासराव देशमुख त्याला जवळ घेत आहे असे दिसत आहे
महाराष्ट्राचे दिवंगत नेते विलासराव देशमुख ((Vilasrao Deshmukh) यांची आज 75 वी जयंती. महाराष्ट्राचे हसरे, कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे नेते असे त्यांचे व्यक्तिमत्व. अशा या महान नेत्याच्या जयंतीनिमित्त त्यांचा मुलगा तसेच अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश आपल्या वडिलांच्या म्हणजेच विलासराव देशमुखांच्या फोटोसह जे काही करत आहे ते पाहून त्याला आपल्या वडिलांच्या उणीव किती भासत आहे हे स्पष्ट दिसते.
या टिकटॉक व्हिडिओमध्ये रितेश आपल्या वडिलांच्या पोशाखामध्ये हात घाऊन तो हात आपल्या डोक्यावरून फिरवत आहे. जणू या पोशाखातून स्वत: विलासराव देशमुख त्याला जवळ घेत आहे असे दिसत आहे.Vilasrao Deshmukh Jayanti 2020: सरपंच ते मुख्यमंत्री पुढे केंद्रात मंत्री राहिलेल्या दिवंगत विलासराव देशमुख यांचा थक्क करणारा जीवन प्रवास
पाहा हा भावूक व्हिडिओ
या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला 'अभी मुझमें कहीं' हे बॉलिवूडचे लोकप्रिय गाणे वाजत आहे. रितेशच्या हा हृदयाला स्पर्शून जाणारा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. काही मिनिटांपूर्वीच त्याने हा व्हिडिओ शेअर केला होता.
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2020 10:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

