Vilasrao Deshmukh 8th Death Anniversary: महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाते असे धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख... (Vilasrao Deshmukh) त्यांचा राजकारणातील प्रवास उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचे योगदान खूपच मोलाचे आहे. ही व्यक्ती आपल्या सामान्य आयुष्यातही अत्यंत दिलखुलास अशी होती. महाराष्ट्राचे हसरे, कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे नेते असे त्यांचे व्यक्तिमत्व. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याविषयी जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. एका छोट्याशा गावाचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास खरच थक्क करणारा आहे.
विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1645 या दिवशी लातूर जिल्ह्यातील बाभुळगाव येथे झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंचे शिक्षण घेतले. त्यांनी कला आणि विज्ञान अशा दोन्ही शाखेतून शिक्षण घेतले आहे. पुण्यातील इंडियन लॉ सोसाइटी लॉ कॉलेज येथून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. देशमुख यांना सुरुवातीपासूनच राजकारण, समाजकारण याची आवड होती. त्यामुळे ते विद्यार्थी दशेतूनच चळवळीत सहभागी होते.
आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करण्याआधी विलासराव देशमुख आपल्या गावचे पंच होते त्यानंतर सरपंच झाले आणि मग जिल्हा परिषदचे सदस्य आणि लातूर तालुका पंचायत समितीचे उपाध्यक्ष सुद्धा राहिले. त्यानंतर विलासराव देशमुख हे युवा काँग्रेसचे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष पदावरही कार्यरत होते. विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त मुलगा रितेश ने वडिलांच्या पोशाखासह केले असे काही जे पाहून डोळ्यांच्या कडा ओलावतील, पाहा भावूक व्हिडिओ
त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 1980 ते 1995 मध्ये विधानसभा निवडणुका लढल्या. या दरम्यान त्यांना गृह, ग्रामीण विकास, कृषी, मत्स्य आणि पर्यंटन, उद्योग, परिवहन, शिक्षा असा अनेक पदांवर मंत्री म्हणून कार्यरत राहिले.
त्यानंतर 1995 च्या निवडणुकीत विलासराव देशमुख हरले. मात्र त्यांनी हार न मानता आपले कार्य चालूच ठेवले. या कष्टाचे, त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले ते 1998 मध्ये. जेव्हा ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावार विराजमान झाले. त्यानंतर त्यांना काही कारणास्तव मुख्यमंत्री पद सोडावे लागले. मात्र त्यांनी पुन्हा निवडणुक लढली आणि 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला. त्यानंतर पुन्हा 7 सप्टेंबर 2004 ते 5 डिसेंबर 2008 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहिला.
असा हा विलासराव देशमुखांचा प्रवास खूपच रोमांचक आणि तरुण पिढीला प्रेरणा देईल असाच आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 14 ऑगस्ट 2012 मद्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला.