उत्तर प्रदेशातील (UP) कुख्यात विकास दुबे (Vikas Dubey) याचा आज पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला आहे. यामध्ये दुबे याचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियात या एन्काउंटर बाबत बॉलिवूड मध्ये चित्रपट बनवण्याबाबत विचार करु लागले आहेत. प्रोड्युसर संदिप कपूर यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, विकास दुबे याच्या एन्काउंटर संबंधित चित्रपट बनवल्यास त्यामध्ये अभिनेता मनोज वायपेयी मुख्य भुमिका साकारु शकतो. तसेच याबात आता बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
आज विकास दुबे याचा एन्काउंटर करण्यात आल्यानंतर हे प्रकरण विविध अँगलच्या माध्यमातून पाहिले जात आहे. काही जणांनी या प्रकरणाला राजकिय संबंधासोबत सुद्धा जोडले आहे. परंतु दुबे याचा एकूणच एन्काउंटर हा चित्रपटातील एखाद्या नाट्यमयाचा भाग असल्याचे दिसून आले.तर संदिप कौर याने ट्वीट करत असे पुढे असे म्हटले आहे की, मनोज वाजपेयी जर तु विकास दुबेची भुमिका साकारली तर कसे वाटेल? तु तर कमालच करशील.(Vikas Dubey Encounter: विकास दुबे एन्काऊंटर वर ओमर अब्दुल्लाह, अखिलेश यादव, प्रियंका गांधी यांनी केला सवाल, पहा ट्विट)
What has happened today in the encounter is beyond cinematic and dramatic experience. @BajpayeeManoj how about playing Vikas Dubey in your next? You'll kill it! #VikasDubey #Encounter @DrKumarVishwas
— Sandiip Kapur (@SandiipKapur) July 10, 2020
यावर मनोज वाजपेयी याने ही चुकीची बातमी असल्याचे ट्वीट करत स्पष्ट केले आहे.
Wrong news ! https://t.co/Xp8IfDtikV
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) July 10, 2020
तर कपुर याचा नुकताच भोंसले चित्रपट ज्यामधून मनोज वाजपेयी झळकला आहे तो OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
विकास दुबे याला उज्जैन येथून अटक करण्यात आल्यानंतर कानपूर मध्ये पोलिसांकडून नेले जात होते. त्यावेळी दुबे याने पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी दुबे याच्यावर गोळ्या झाडत त्याचा एन्काउंटर केला. दुबे याच्या एन्काउंटर नंतर आता विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर दुबे याने काही दिवसांपूर्वी आठ पोलिसांवर गोळीबार करत त्यांची हत्या केली होती.