विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे स्टारर 'लायगर' (Liger) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. याआधी चित्रपटाविषयी बरीच चर्चा होती, पण जेव्हा तो चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तेव्हा त्याचे शो चालवणे कठीण झाले. अशाप्रकारे चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. असे वृत्तही आहे की निर्माते वितरकांना पैसे परत करण्याचा विचार करत आहेत जेणेकरून किमान त्यांचे नुकसान भरून काढता येईल. यामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, 'लायगर' चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Puri Jagannath) मुंबईतील आपला फ्लॅट रिकामा करून दक्षिणेत परत जाण्याचा विचार करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगन्नाथ मुंबईतील एका पॉश सोसायटीमध्ये सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. या घराचे मासिक भाडे 10 लाख रुपये असून, देखभालीचा खर्च वेगळा भरावा लागतो. मात्र चित्रपट अपयशी ठरल्यानंतर पुरी जगन्नाथ मुंबईसोडून पुन्हा हैदराबादला जाण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरी लवकरच आपला फ्लॅट रिकामा करणार आहे, कारण त्याला तो आता परवडत नाहीये.
अलीकडेच अशीही बातमी आली होती की 'लायगर’ वाईटरित्या फ्लॉप झाल्यानंतर पुरी जगन्नाथने विजय देवरकोंडासोबतचा त्यांचा आगामी चित्रपट 'जन गण मन' अनिश्चित काळासाठी होल्डवर ठेवला आहे. 25 ऑगस्ट रोजी 'लायगर’ रिलीज होण्यापूर्वी, विजय देवरकोंडा आणि पुरी जगन्नाथ हे 'जन गण मन' नावाच्या आणखी एका प्रकल्पावर एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. (हेही वाचा: Ayan Mukerji: आलिया भट्ट, रणबीर कपूर यांना महाकालेश्वर मंदिरात दर्शन न मिळाल्याचे दु:ख वाटते- आयान मुखर्जी)
दरम्यान, ट्रेड सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लायगर’ या चित्रपटाने भारतभरात ओपनिंग वीकेंडमध्ये 35 कोटी रुपयांचा व्यवसाय केला, जो चित्रपटाच्या प्रमाणाचा विचार करता निराशाजनक आकडा आहे. या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विजय देवरकोंडाचा बॉलीवूड डेब्यू खूपच वाईट ठरला आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून वाईट रिव्ह्यू मिळाले आहेतच, याशिवाय प्रेक्षकांनीही चित्रपटाला पूर्णपणे नाकारले.