Alia Bhat & Ranbir Kapoor | (Photo Credit - Twitter)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Alia Bhat & Ranbir Kapoor) मंगळवारी सायंकाळी महाकाल मंदिरात (Mahakaleshwar Temple) दर्शनासाठी गेले होते. मात्र, 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादात विश्व हिंदू परिषत आणि बजरंग दल या संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना मंदिरात दर्शनासाठी जाता आले नाही. परिमामी दर्शन न घेताच त्यांना परतावे लागले. या पार्श्वभूमीवर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा दिग्दर्शक आयान मुखर्जी (Ayan Mukerji) याने प्रतिक्रिया दिली आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या जोरदार चर्चेत आहेत. त्यांचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. दरम्यान, रणबीर आणि आलिया यांना दर्शनाशिवाय परतावे लागल्यानंतर भूमिका व्यक्त करताना आयान मुखर्जी याने म्हटले आहे की, मला फार वाईट वाटले. रणबीर आणि आलिया माझ्यासोबत महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येऊ शकले नाहीत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना देवदर्शन नाकारल्यानंतर प्रथिमच आयान मुखर्जी याची प्रतिक्रिया आली आहे. (हेही वाचा, Brahmastra: रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अयान मुखर्जी यांनी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला दिली भेट, बजरंग दलाच्या सदस्यांनी काळे झेंडे दाखवून केला विरोध (Watch Video))

ट्विट

प्राप्त माहितीनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाताना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांसारख्या कट्टर हिंदुत्त्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे त्यांना दर्शनासाठी जाता आले नाही. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे नेते अंकित चौबे यांनी म्हटले आहे की, रणबीर कपूर यांनी बीफच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त विधान केले होते. ज्यामुळे महाकालेश्वर मंदिरात प्रवेश करताना त्यांना रोखण्यात आले. दुसऱ्या बाजूला आलिया आणि रणबीर यांना उज्जैन येथी महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेताच परतावे लागले.