Varun Dhawan Fitness Video: भेडीया चित्रपटाच्या सेटवर वर्कआऊट करताना दिसला वरूण धवन; सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) याने अभिनयासह फिटनेसच्या जोरावरही अनेक चाहत्यांची मन जिंकली आहेत.

बॉलिवूड Ashwjeet Jagtap|

Varun Dhawan Fitness Video (Photo Credit: Instagram)

बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता वरूण धवन  (Varun Dhawan)  याने अभिनयासह फिटनेसच्या जोरावरही अनेक चाहत्यांची मन जिंकली आहेत. बॉलिवूडमधील फिट अभिनेत्यांसह वरून धवन याचेही नाव घेतले जाते. वरूण धवन हा त्याचा नवीन चित्रपट भेडियाच्या (Bhediya) शुटींगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या शुटींगच्या संबंधित अनेक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. भेडिया चित्रपटाची शुटींग अरुणाचल प्रदेशमध्ये सुरु आहे. या चित्रपटाच्या सेटवर वरूण धवन याने वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे. तर, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

वरूण धवन याने नुकताच इंन्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो शर्टलेस दिसत आहे. या व्हिडिओला त्याने मिस्टर बूमबाटीक-फ्लो असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओवर धवनच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. हे देखील वाचा- Wagle Ki Duniya: सुमित राघवनचा शो ‘वागले की दुनिया’च्या सेटवर 8 जणांना कोरोना विषाणूची लागण; BMC कडून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश

वरूण धवनची इन्टाग्राम पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरूण धवनसह त्याची पत्नी नताशा दलालदेखील अरूणाचल प्रदेशमध्ये उपस्थित आहे. दोघांनी एकसोबत असलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याचदरम्यान, अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यात गावात भीषण आग लागल्याची घटना घडली उघडकीस आली होती. ज्यामध्ये 143 झोपडपट्टय़ा जळून खाक झाल्या आहेत. तर, 1 मुलासह 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर वरुण धवन आणि नताशा यांनी पीडितांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी गावाच्या मदतीसाठी 1 लाख रुपये दिले होते.