Varun Dhawan's Instagram Story

कोरोना व्हायरस मुळे देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. यामुळे गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या या लॉकडाऊन रोजंदारीवर जगणा-या कामगारांचे चांगलेच हाल झाले आहेत. त्यात फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्र बंद असल्यामुळे पोटाची खळगी भरायची कशी अशा प्रश्न पडद्यामागे काम करणा-या कामगारांना पडला आहे. यामुळे अशा बेरोजगार झालेल्या तब्बल 5 लाख लोकांच्या मदतीसाठी धावून आलाय अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) . 25 एप्रिलला वरुण धवन याचा वाढदिवस झाला. या निमित्ताने वरुणने फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रातल्या तब्बल 5 लाख कर्मचा-यांना मदत केली.

FWICE चे सल्लागार अशोक पंडित यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देत वरुण धवन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना विरुद्धच्या लढ्यात विद्या बालन हिने निवडला मदतीचा अनोखा मार्ग; Tring सह भागीदारी करत 1000 PPE कीट्स केले दान

या व्हिडिओ मध्ये अशोक पंडित यांनी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज, फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रातले तब्बल 5 लाख कामगारांना केलेल्या मदतीबाबत वरुण धवन यांचे आभार मानतो. तुम्ही जी या कामगारांना मदत केली आहे ते खरंच कौतुकास्पद असल्याचे सांगितले आहे.