कोरोना विरुद्धच्या लढ्यात विद्या बालन हिने निवडला मदतीचा अनोखा मार्ग; Tring सह भागीदारी करत 1000 PPE कीट्स केले दान
Vidya Balan (Photo Credits : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने कोरोना व्हायरस संकटात मदत करण्याचा वेगळा मार्ग निवडला आहे. कोविड 19 मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थिती डॉक्टरांसह सर्व आरोग्य सेवक जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. दरम्यान जगभरात तुटवडा असणाऱ्या PPE कीटची कमतरता देशातही जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य सेवकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर आहे. या परिस्थितीचे भान राखत विद्या बालन हीने सेलिब्रिटी प्लॅटफॉर्म ट्रिंग सह 1000 पीपीई कीट दान करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ती दृश्यम फिल्म्सचे मनीष मुंद्रा (Manish Mundra), फोटोग्राफर-निर्माते अतुल कसबेकर (Atul Kasbekar) यांच्यासह काम करत आहे. त्याचबरोबर विद्या बालन हिने या कामात मदत करण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले आहे.

यासाठी तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत विद्याने लिहिले की, कोरोना व्हायरस संकटात आपल्या आरोग्य सेवकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी पीपीई कीट देणे गरजेचे आहे. मी आरोग्य सेवकांसाठी 1000 पीपीई कीट दान करत आहे. तसंच अजून पीपीई कीट दान करण्यासाठी ट्रिंग सह हातमिळवणी केली आहे. देशभरात आपल्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना 1000 कीटची तातडीने गरज होती. विद्या बालन हिने ब्लाऊज पीस आणि रबर बँड पासून बनवला मास्क; 'आपला देश, आपला मास्क' म्हणत चाहत्यांसोबत शेअर केला व्हिडिओ (Watch Video)

विद्या बालन पोस्ट:

 

View this post on Instagram

 

Namaste, it is critical that we provide PPE (Personal Protective Equipment) kits to our healthcare workers for their protection in this #WarAgainstCovid19. I am donating 1000 PPE kits for our medical staff and have partnered with Tring to raise donation for another 1000 PPE kits which are in immediate need across India for our doctors and medical staff. For your contribution, I will send you a personal thank you video message recognising your generosity. This video will be in permanent memory with you. Log onto www.tring.co.in and go to my profile to donate or you can click this link: www.tring.co.in/Vidya-Balan Let's all join the #WarAgainstCovid19 and #UniteForHumanity #StaySafe #StayHome #JustTringIt #IndiaFightsCorona

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

विद्या बालन हिने यापूर्वी सध्याच्या परिस्थितीत मास्क महत्त्व जाणत घरच्या घरी मास्क कसा बनवता येईल याची माहिती दिली होती. त्यासाठी तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तिने ब्लाऊज पीस आणि रबर बँडपासून अगदी सोप्या पद्धतीने मास्क बनवण्याची पद्धत आपल्या चाहत्यांसह शेअर केली होती.