पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' मोहिमेला मिळाली सारा अली खान-वरुण धवन यांची साथ, 'Coolie No 1' च्या सेटवर झाला मोठा बदल
वरुण धवन आणि सारा अली खान (File Photo)

वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा आगामी 'कुली नंबर 1' (Coolie No 1) सिनेमाबद्दल सुरुवातीपासूनच चर्चेत रंगली आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या चित्रपटाचा हा रिमेक आहे. आता या चित्रपटाच्या सेटमधून एक चांगली बातमी समोर येत आहे. सिनेमाच्या या रिमेकमध्ये वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याची चर्चा होत आहे. बरेचदा दोन्ही स्टार्स सेटवरून व्हिडिओ शेअर करत असतात, पण आता 'कुली नंबर 1' च्या सेटवर एक काम केले गेले आहे ज्याची प्रशंसा केल्याशिवाय आपणही राहू शकणार नाही. पर्यावरणाची ढासळणारी स्थिती पाहता चित्रपट निर्मात्यांनी हा सेट पूर्णपणे प्लास्टिकमुक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (सारा अली खान च्या Viral Video मुळे घरातून पळून गेलेल्या मुलाची कुटुंबाशी भेट Watch Video)

हिंदी चित्रपटसृष्टीत हे प्रथमच आहे, जेव्हा चित्रपटाचा संपूर्ण सेट प्लास्टिकमुक्त ठेवला जाईल. वरुणने ट्विटरवर एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "प्लास्टिकमुक्त राष्ट्र होणे ही काळाची गरज आहे आणि हा महान उपक्रम आमच्या पंतप्रधानांनी सुरू केला आहे. आपण सर्व छोटे-छोटे बदल करून हे करू शकतो. आता # CoolieNo1 च्या सेटवर फक्त स्टीलच्या बाटल्या वापरल्या जातील."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी प्लास्टिकविरूद्ध 'सिंगल यूज प्लास्टिक' ही मोहीम राबविली होती, त्यास देशातील मोठ्या, प्रसिद्ध व्यक्तींनी पाठिंबा दर्शविला होता. 'सिंगल यूज प्लॅस्टिक' अभियानाला आमिर खान, आयुष्मान खुराना आणि करण जोहर यांच्यासह देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी पाठिंबा दर्शविला. आणि याचअंतर्गत 'कुली नंबर 1' चा सेट प्लास्टिक फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, 'कुली नंबर 1' हा चित्रपट पुढील वर्षी 1 मे रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटाशिवाय सारा कार्तिक आर्यन याच्यासोबत 'लव आज कल 2' मध्येही दिसणार आहे.