सारा अली खान च्या Viral Video मुळे घरातून पळून गेलेल्या मुलाची कुटुंबाशी भेट (Watch Video)
Sara Ali Khan Viral Video With Fan (Photo Credits: Youtube/ Screengrab)

एखाद्या ठिकाणी सेलिब्रिटी दिसला की त्याच्यामागे फोटोसाठी चाहत्यांनी झुंबड करणं हा तसा रोजचाच प्रकार. या चाहत्यांचा सेलिब्रिटींवर कितीही जीव असला तरी अनेकदा जीव काढणारे चाहते अक्षरशः नकोसे करून सोडतात. असाच काहीसा प्रकार अलीकडे सारा काली खान (Sara ali Khan) सोबत घडला.काही दिवसांपूर्वी सारा मुंबई एयरपोर्टवर पाहायला मिळाली होती, यावेळी तिच्या फॅन्सनी तिच्याभोवती गराडा घातला. यातील जो तो जमेल तसा तिला आपल्यासोबत सेल्फी मध्ये घेऊ पाहत होता. अशातच एका मुलाचा अतिउत्साहात साराला धक्का लागला, योगायोगाने हा क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला आणि क्षणार्धातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या व्हिडीओमुळे मुलावर टीका होत असली तरी यावेळी एका कुटुंबाला मात्र मोठा आनंद झाला होता. या व्हडिओ मध्ये दिसणार मुलगा हा आपल्या घरातून काही वर्षांपूर्वी पळून गेला होता. खूप प्रयत्न करूनही टायचा काहीच पत्ता लागत नव्हता मात्र या एका व्हायरल व्हिडीओमुळे त्याच्या कुटुंबाला आपल्या मुलाचा पत्ता गवसला. ('सारा अली खान' आणि 'कार्तिक आर्यन'चा Kissing व्हिडिओ सोशल मीडियात झाला लीक (Video)

पहा हा व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या मुलाचे नाव अजय असे असून त्याचे वय अवघे 17 वर्ष आहे. इयत्ता दहावीत शिकणारा अजय काही दिवसांपूर्वी घरातून एटीएम कार्ड  घेऊन पळून गेला होता. त्याच्या आई वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार करून त्याला शोधण्याचे सर्व प्रयत्न करून पहिले होते, मात्र काही केल्या त्याचा ठावठिकाणा समजत नव्हता अशा वेळी कित्येकदा त्यांना अजयचे काही बरे वाईट तर झाले नसेल असाही विचार येऊन गेला. पण आता या व्हिडीओमुळे आपला मुलगा सुरक्षित असल्याचे खात्री पटून अजयच्या कुटुंबांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दरम्यान व्हिडीओ पाहताच अजयच्या आई वडिलांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली, तूर्तास पोलीस अजय ला त्याच्या घरी परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.