Bhediya Teaser: वरुण धवन आणि क्रिती सेनॉन स्टारर 'भेड़िया' चित्रपटाचा टीजर पाहून अंगाचा उडेल थरकाप, Watch Video
Bhediya Teaser (Photo Credits: Instagram)

अनलॉकच्या टप्प्यात हळूहळू बिग बजेट हिंदी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. अनेक बहुप्रतिक्षित असे बिग बजेट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील समोर आले आहे. त्यात आता वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) स्टारर एक कॉमेडी आणि हॉरर ने भरलेला 'भेड़िया' (Bhediya Teaser) चित्रपटाचा टीजर समोर आला आहे. ज्याच्या माध्यमातून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे. 14 एप्रिल 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजर पाहून अंगाचा थरकाप उडाल्याखेरीज राहणार नाही. स्त्री आणि बाला या चित्रपटांचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी हा चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियाल देखील या प्रोजेक्टचा भाग असतील.

या चित्रपटाचा टीजर पाहिलात तर तुम्हाला दिसेल यात एक तरुण अंधा-या पौर्णिमेच्या रात्री डोंगरावर उभा आहे. जसा चंद्राचा प्रकाश दिसतो तसा तो तरुण भेडिया होतो.हेदेखील वाचा- Sidharth Malhotra ​​आणि Kiara Advani चा 'Shershaah' चित्रपट या दिवशी रिलीज होणार; करण जोहरने पोस्टर शेअर करत दिली माहिती

पाहा टीजर

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

लग्नानंतर वरुण धवनचा हा पहिला चित्रपट असेल. रिपोर्टनुसार असे सांगण्यात येत आहे की, या चित्रपटाचे शेड्यूल खूप मोठे असणार आहे. फिल्मचे शूटिंग मेपर्यंत चालेले. यात वीएफएक्स आणि प्रोस्थेटिक्सचा सुद्धा वापर करण्यात येणार आहे.

भेड़िया चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर तुम्हाला 1992 साली प्रदर्शित झालेल्या 'जुनून' चित्रपटाची आठवण होईल. या चित्रपटात राहुल रॉय, पूजा भट्ट, अविनाश वाधवान प्रमुख भूमिकेत होते.