योगी आदित्यनाथ आणि मधुर भंडारकर (Photo Credits-Instagram)

Madhur Bhandarkar Meets CM Yogi Adityanath: चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी रविवारी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. या वेळी दोघांनी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि सुंदर अशा फिल्म सीटी संबंधित मुद्द्यावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी फिल्म निर्माते भंडारकर यांना भेट स्वरुपात एक नाणे दिले. त्यावर भगवान श्रीराम यांचा फोटो साकारण्यात आली आहे. त्याचसोबत रामचरितमानसची एक प्रत, तुळशीपत्रांची माळ आणि एक भव्य कुंभ कॉफी टेबल सुद्धा दिले. जे गेल्या वर्षात प्रयागराज मध्ये आयोजित केले होते.(Kangana Ranaut: शिवसेना सोबत भिडल्यानंतर  महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची कंगना रनौत घेणार भेट)

सरकार मधील एका प्रवक्त्याच्या मते, भंडारकर यांनी मुख्यमंत्र्यांना फिल्म सीटीच्या निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या आणि चित्रपटाच्या परंपरेकडून पूर्ण सहकार्य करण्याचे सुद्धा आश्वासन दिले आहे. आदित्यनाथ यांनी फिल्म सीटीच्या निर्मितीसाठी अधिकाऱ्यांना योग्य जागा शोधण्यास सांगितले आहे.(PM Narendra Modi Birthday: कंगना रनौत हिने व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पहा काय म्हणाली)

उत्तर प्रदेशातील सराकरने एका विधानात असे म्हटले की, सीएम गौतमबुद्ध नगर जिल्ह्यात देशातील सर्वात मोठी आणि सुंदर अशी फिल्म सीटीची निर्मिती करणार आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना नोएडा, ग्रेटर नोएडा किंवा यमुना एक्सप्रेस वे या ठिकाणी एक उपयुक्त जमीन शोधण्यास आणि त्यावर काम करण्याचे निर्देशन दिले आहेत. भाजपचे युपी युनिटचे सचिव चंद्र मोहन यांनी असे म्हटले आहे की, फिल्म सीटीमुळे रोजगाराची संधी निर्माण होईल. त्यामुळे सरकारचे उत्पन्न सुद्धा वाढेल. ऐवढेच नाही तर राज्याचा समृद्ध वारसा सुद्धा समोर येईल.