PM Narendra Modi Birthday: कंगना रनौत हिने व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पहा काय म्हणाली
PM Narendra Modi & Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मोदींवर देश आणि परदेशातूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकर्त्ये, क्रीडापटू, चाहते यांच्यासह सेलिब्रेटीजही मोदींना विशेष संदेश पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यात अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने देखील व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओद्वारे तिने मोदींप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त करत तुमच्यासारखा पंतप्रधान लाभणे हे आमचे भाग्य आहे, असे म्हटले आहे. (Happy Birthday PM Narendra Modi: राहुल गांधी, नेपाळचे पंतप्रधान KP Sharma Oli यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 70व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!)

पाहुया कंगना रनौत नेमकं काय म्हणाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यासाठी कंगना रनौत हिने ट्विटरवर खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणते, "माननीय पंतप्रधानजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपली नीट कधी भेट झाली नाही. फोटो ऑप्ससाठी आपण भेटलो असून त्यामुळे तुमच्याशी बोलण्याची मला कधी संधी मिळाली नाही. पण मी तुम्हाला सांगते की हा देश तुम्हाला खूप मानतो. इथे खूप आवाज आहे, गोंधळ आहे. तुमच्या बद्दल जे काही बोललं जातं ते कदाचितच कोणाबद्दल बोललं जात असेल आणि इतका अपमान केला जात असेल. कोणत्या इतर पंतप्रधानांप्रती कदाचित असे अभद्र आणि चुकीचे शब्द वापरले जात असतील."

Kangana Ranaut Tweet:

कंगना पुढे म्हणाली की, "मग तुम्हाला माहित आहे, हे खूप कमी लोक आहेत. हा प्रोपोगंडा आहे. पण असे करोडो भारतीय आहेत त्यांचा आवाज सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत पोहचत नाही. मी हे जेव्हा पाहते तेव्हा मला असं वाटतं की, इतका सन्मान, इतकी भक्ती यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानां मिळाली नसावी. करोडो भारतीय तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. आम्ही खूपच भाग्यशाली आहोत की आम्हाला तुमच्यासारखे पंतप्रधान लाभले. जय हिंद."

पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर सिनेक्षेत्रात काम करणाऱअया ज्युनियर आर्टिस्ट्सच्या सुरक्षा आणि आर्थिक साहाय्य याविषयी मोदींशी बोलणार असल्याचे अलिकडेच कंगन रनौत हिने सांगितले. तसंच तिच्याकडे अनेक मुद्दे असून मोदींशी चर्चा करुन यातून मार्ग काढण्याचा तिचा मानस आहे.