Happy Birthday PM Narendra Modi: राहुल गांधी, नेपाळचे पंतप्रधान KP Sharma Oli यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 70व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत देशभरात दिल्लीपासून अनेक गल्लींमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कुठे रॅली आहेत तर कुठे 70 किलोच्या लाडवाचा भोग चढवला जात आहे. काही ठिकाणी रक्तदान शिबिरांचंदेखील आयोजन करण्यात आलं आहे. आज राजकीय मतभेद बाजूला ठेवत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, नेपाळचे पंतप्रधान KP Sharma Oli यांनी तर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत अनेक दिग्गजांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सेवा सप्ताहच्या स्वरूपात साजरा केला जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली आहे. Narendra Modi Birthday Wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Whatsapp Status, Facebook वर शेअर करता येतील हे खास फोटो

राहुल गांधी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नेपाळचे पंतप्रधान KP Sharma Oli

राजनाथ सिंह

 

 

अमित शाह

 

नरेंद्र मोदी यांंचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला होता यंंदा ते वयाच्या 71 व्या वर्षात पदार्पण करत आहेत, मोदींंबाबर विशेष म्हणजे स्वतंत्र भारतात जन्मलेले ते पहिले वहिले पंंतप्रधान आहेत. 2014 पुर्वी केवळ गुजरात पुरतं मर्यादित असलेले नरेंद्र मोदी आज भारताची ओळख म्हणुन जगभर प्रसिद्ध आहेत. 2014 पासुन देशाची धुरा पंतप्रधान म्हणून सांंभाळत आहेत.