Urmila Matondkar ने खास फोटो शेअर करत पती Mohsin Akhtar Mir ला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Urmila Matondkar with husband Mohsin Akhtar Mir (Photo Credits: Twitter)

'रंगीला गर्ल' अशी ओळख असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. आज तिच्या लग्नाचा वाढदिवस असून लग्नसोहळ्यातील अत्यंत खास फोटो शेअर करत तिने पती मोहसिन अख्तर मीर (Mohsin Akhtar Mir) याला शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो अत्यंत मोहक असून चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या फोटोत नवरीच्या वेशात उर्मिला अत्यंत सुंदर दिसत आहे. तिने या लग्नाच्या आठवणींना उजाळा देत लिहिले की, "अतिशय मौल्यवान असा मंगळसुत्र क्षण आणि पाच वर्षांचा सुंदर प्रवास ज्यात आमचे जीवन समृद्ध झाले." (Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस निवडणूक खर्चातून उरलेली 20 लाख रुपयांची रक्कम दिली मुख्यमंत्री सहायता निधीला)

उर्मिला 3 मार्च 2016 मध्ये बॉयफ्रेंड मोहसिन अख्तर मीर सोबत विवाहबद्ध झाली. वांद्रे येथील निवासस्थानी हा सोहळा संपन्न झाला होता. मोहसिन काश्मीरी मुसलमान असल्याने विवाहनंतर उर्मिलाला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. दरम्यान, अजूनही यावरुन तिच्यावर टीका-टीपण्णी केली जाते.

पहा फोटो:

अभियनानंतर राजकीय क्षेत्रात उर्मिला मातोंडकरने दुसरी इनिंग सुरु केली आहे. या नव्या करियरमध्ये उर्मिला अत्यंत व्यस्त असते. यावर बोलताना उर्मिला म्हणते की, "राजकीय क्षेत्र माझ्यासाठी नवं असल्याने हे करियर सिनेमापेक्षा अधिक वेळ घेतं. यात मी नवशिखी असले तरी याचा मी पूर्णपणे आनंद घेते. मला सिनेमा आणि अभिनय याप्रमाणेच राजकरणाचीही आवड आहे."