ऊर्मिला मातोंडकर (Photo Credits: Instagram)

Urmila Matondkar Purchases New Luxury Office: बॉलिवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) चित्रपट क्षेत्रात अभिनय केल्यानंतर आता राजकारणात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. उर्मिलाने नुकताचं शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसातचं मुंबईतील खार भागात ऊर्मिलाने स्वत: साठी एक अतिशय आलिशान कार्यालय खरेदी केले आहे. असं म्हटलं जातयं की, ही मालमत्ता खूप मौल्यवान असून तिचं लोकेशन खूपचं चांगलं आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, उर्मिलाने मुंबईतील खार लिंक रोडवरील इमारतीत ही संपत्ती विकत घेतली आहे. या ठिकाणी कार्यालयाचे मासिक भाडे सुमारे 5 से 8 लाख आहे. अभिनेत्रीने हे कार्यालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर विकत घेतले आहे.

ऊर्मिलाने हे ऑफिस एका व्यावसायिकाकडून 3 कोटी 75 लाखामध्ये खरेदी केलं आहे. या प्रोपर्टीची डिल 28 डिसेंबरला पार पडली. शिवसेनेच्या 12 उमेदवारांमध्ये उर्मिला यांचा समावेश आहे, ज्यांची राज्य सरकारकडून शासकीय कोट्यातून विधानपरिषदेकडे शिफारस केली गेली होती. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी म्हटलं होत की, आपल्याला एक उत्तम लोकनेता व्हायचं आहे. आपल्या कठोर परिश्रमांनी लोकांची मने जिंकायची आहेत. (वाचा - Akshay Kumar ने आपल्या अ‍ॅक्शन गेम FAU-G चं अॅन्थम सॉन्ग केलं रिलीज; पहा जबरदस्त व्हिडिओ)

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश करून उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणुक लढवली होती. मात्र, त्यावेळी ऊर्मिलाचा पराभव झाला होता. आता ऊर्मिला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

नवीन कार्यालयाच्या खरेदीनंतर ऊर्मिला यांना प्रचंड टीकेला सामोर जाव लागत आहे. त्यामुळे अभिनेत्रीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. या पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर करत ऊर्मिला यांनी म्हटलं आहे की, माझ्या नव्या कार्यालयाबाबत विरोधकांनी आणि काही माध्यमांनी चुकीची माहिती पसरवली आहे. लॉकडाऊनच्या काळात आपण अंधेरीच्या डी.एन. नगर भागातील आपला एक फ्लॅट विकला होता. त्याच पैशातून आपण हे कार्यालय खरेदी केल्याचं उर्मिला यांनी म्हटलं आहे.