बॉलिवूडमधील क्युट आणि लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)... ट्विंकलने लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम केला असला तरीही ती अनेक पुरस्कार सोहळ्यात दिसते. तसेच सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली ट्विंकल आपल्या पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांची जोडलेली असते. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री आपल्याला ऑफस्क्रिनही अनेकदा पाहायला मिळते. मुलाखतीत म्हणा, मिडियासमोर अनेकदा ते एकमेकांची टिंगल उडवतानाही दिसतात. त्यामुळे आपल्या ख-या आयुष्यात देखील त्यांच्या किती छान बाँडिंग आहे हे वारंवार आपल्याला पाहायला मिळते. नुकताच तिने अक्षयसोबतचा एक फोटो शेअर करुन तमाम जोडप्यांना घटस्फोट न होण्यासाठी काय करता येईल हे सांगितले आहे.
ट्विंकलने अक्षय कुमारसोबतचा हसताना आणि एकमेकांशी मस्करी करतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत घटस्फोटापासून वाचण्याच कारण ट्विंकलने सांगितले आहे. "इन्स्टाग्रामवरील जोडी आणि खऱ्या आयुष्यातील जोडी. आपण ज्या प्रमाणे कॅमेऱ्यासमोर आनंदी राहतो तसेच जर आपण खऱ्या आयुष्यात एकमेकांकडे पाहून हसलो तर घटस्फोट होणार नाहीत #smileokplease" असे हॅशटॅग देखील दिले आहे. हेदेखील वाचा- Akshay Kumar चा सूर्यवंशी सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज?
View this post on Instagram
ट्विंकलच्या या फोटोला 3 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोत ट्विंकलने सोशल मीडियावर दाखवण्यात आलेली जोडी आणि खऱ्या आयुष्यात ती जोडी कशी असते याचा फरक सांगितला आहे.
अक्षय आणि ट्विंकलने 17 जानेवारी 2001 रोजी विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला नुकतीच 20 वर्षे झाली आहेत. तसेच त्यांना आरव आणि नितारा दोन मुलंही आहेत.