Total-Dhamaal (Photo Credits: You Tube)

Total Dhamaal Review:  इंद्र कुमार दिग्दर्शित 'Total Dhamaal' हा सिनेमा आज भारतासह देशभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. मल्टीस्टारर असणारा हा सिनेमा अनेक कारणांसाठी चर्चेमध्ये आहे. या सिनेमामध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) आणि माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) ही जोडी तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये एका खास खजिन्याच्या शोधात निघालेलेल्यांची रंजक सफर पहायला मिळणार आहे. त्याच्या जोडीला कॉमेडी आणि व्हीएफएक्सची मज्जा लुटता येणार आहे. भारताआधी UAE मध्ये रिलीज झालेल्या टोटल धमाल (Total Dhamaal) या सिनेमाला रसिकांकडून पसंतीची पावती मिळत आहे. त्यामुळे पहा कसा आहे या सिनेमाचा रिव्ह्यू Total Dhamaal Trailer: 'टोटल धमाल'चा धमाकेदार ट्रेलर, 17 वर्षांनी अनिल कपूर - माधुरी दीक्षित एकत्र

सिनेमाचा रिव्ह्यू

Khaleej Times-:

दोन तासांचा पैसा वसूल सिनेमा आणि हमखास Entertain करेल असा 'टोटल धमाल' हा सिनेमा आहे. फॅमिलीसोबत एकत्र बसून नक्की हा सिनेमा एन्जॉय करू शकता.

Pune Times-:

पुणे टाईमच्या रिव्ह्यू नुसार, या सिनेमाची तगडी स्टारकास्ट पाहता त्यांना अधिक दर्जेदार विनोदाची अपेक्षा होती. मात्र स्लॅपस्टिक प्रकारातील हा सिनेमा ठिकठाक आहे. सिनेमाचं लिखाण आणि सिनेमात काही गोष्टींवर अधिक लक्ष दिलं असतं तो प्रभावी होऊ शकला असत.

Times Of India -:

टाईम्स ऑफ इंडियाने अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या जोडीचं कौतुक केलं आहे. या सिनेमात त्यांची कॉमेडी आणि जोडीची धम्माल मस्ती, टाईमिंग यासाठी एकदा सिनेमा पहायलाच हवा.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

 

सिनेमामध्ये 'पैसा ए पैसा' आणि 'मुंग़डा' ही दोन गाणी पुन्हा नव्याने रचण्यात आली आहेत. सिनेमच्या ट्रेलरमधून सिनेमा बॉक्सऑफिसवर धम्माल करणार याची चुणूक होतीच आता या सिनेमाचे आज सकाळचे रिव्ह्यू सकारात्मक असल्याने या आठवड्यात तुम्हांला खळखळून हसायचं असेल तर हा सिनेमा नक्की पहायला हवा.  पहिल्याच दिवशी हा सिनेमा 10-15 कोटीचा गल्ला जमवेल असे अंदाज आहेत.