Total Dhamaal Trailer: 'टोटल धमाल'चा धमाकेदार ट्रेलर, 17 वर्षांनी अनिल कपूर - माधुरी दीक्षित एकत्र
Total-Dhamaal (Photo Credits: Youtube)

Total Dhamaal Trailer: 'धमाल' सीरिजमधील तिसरा सिनेमा 'टोटल धमाल' (Total Dhamaal) सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला आहे. नावाप्रमाणेच ट्रेलर पाहून हा सिनेमा 'टोटल धमाल' असणार याची प्रचिती येते. या सिनेमामध्ये अजय देवगण (Ajay Devgan), रितेश देशमुख (Riteish Deshmukh), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), अर्शद वारसी, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर, अनिल कपूर(Anil Kapoor)अशा तगड्या कलाकारांची फौज आहे. खजिन्याच्या शोधात निघालेल्या जोड्या आणि त्यादरम्यान होणारी धमालमस्ती या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहता येणार आहे.

टोटल धमालमध्ये तगड्या स्टारकास्टसोबतच रसिकांची जंगलसफारीदेखील होणार आहे. भव्य स्वरूप लोकांसमोर घेऊन येताना सिनेमामध्ये व्हिएफएफ्सचादेखील वापर करण्यात आला आहे. या सिनेमाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे सुमारे 17 वर्षांनंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहे. 'पुकार' सिनेमामध्ये अनिल कपूर आणि माधुरी एकत्र दिसले होते.

'टोटल धमाल' हा सिनेमा 22फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. इंद्र कुमार यांनी 'टोटल धमाल' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रितेश देशमुख, माधुरी दीक्षित सोबतच ट्रेलरमध्ये महेश मांजरेकरांचीदेखील झलक दिसली आहे.