
उर्फी जावेदला (Urfi Javed) आपण विचित्र कपडे परिधान करून वेगवेगळ्या ठिकाणी पोझ देताना पाहिले असेल. जेव्हा जेव्हा उर्फीचे नाव समोर येते तेव्हा तिची अशीच अतरंगी कपड्यामधील छबी डोळ्यासमोर येते. उर्फीच्या हटके स्टाईलमुळे ती सोशल मिडियावर बरीच ट्रोल झाली आहे. आता अशाच कपड्यांमुळे प्रकाशझोतात आलेल्या उर्फी जावेदने एक नवा विक्रम केला आहे, ज्यामध्ये तिने कंगना रणौत, कियारा अडवाणी आणि जान्हवी कपूर अशा अभिनेत्रींना मागे टाकले आहे. उर्फी जावेदने जगातील सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या 100 आशियाईंमध्येही (100 Most Searched Asians Worldwide) स्थान पटकावले आहे.
या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या इतर नावांबद्दल बोलायचे झाले तर, BTS V पहिल्या क्रमांकावर आहे. जंगकूक दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर दिवंगत पंजाबी रॅपर आणि गायक सिद्धू मूसवालाचे नाव आहे. बीटीएस व्होकलिस्टने चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. स्वर कोकिळा या नावाने प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे.
याशिवाय या यादीमध्ये ब्लॅकपिंकची रॅपर लिसाचे नाव सहाव्या क्रमांकावर आहे. सातव्या क्रमांकावर नवविवाहित कतरिना कैफ आहे, आलिया भट्ट आठव्या क्रमांकावर आहे. प्रियांका चोप्रा नवव्या क्रमांकावर आहे. यासोबतच विराट कोहलीने 10वे स्थान आपल्या नावावर केले. भाईजान म्हणजेच सलमान खान 11 व्या स्थानावर आहे. या यादीमध्ये ऐश्वर्या राय 26, दीपिका पदुकोण 28, अजय देवगण 52 व्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा: कंडोम ब्रँड Durex India ने आलिया-रणबीरचं केलं फिल्मी शैलीत अभिनंदन; पोस्ट नंतर सोशल मीडियावर पडतोय मीम्सचा पाऊस)
उर्फी जावेद या संपूर्ण यादीत 57 व्या क्रमांकावर आहे. तिच्या मागे कियारा, कंगना आणि जान्हवी यांचा नंबर लागतो. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत, उर्फी तिच्या विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून उदयास आली आहे. 'बिग बॉस ओटीटी' नंतर तिची लोकप्रिया अजूनच वाढली. तिने 'बडे भैय्या की दुल्हनिया', 'मेरी दुर्गा', 'बेपन्हा’ आणि 'पंच बीट सीझन 2' सारख्या शोमध्ये काम केले आहे.