Alia Bhatt-Ranbir Kapoor Announce Pregnancy: कपूर कुटुंबात लवकरच नवा पाहुणा येणार आहे. रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्ट हिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे घोषणा केली की ती आई होणार आहे. तिने स्वतःचा आणि रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला, जिथे ते डॉक्टरांना भेटायला गेले होते. आलियाच्या फोटोमध्ये ती बेडवर पडून अल्ट्रासाऊंड मशीनच्या स्क्रीनकडे पाहत असल्याचे दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना आलियाने म्हटलं होतं की, 'आमचे बाळ लवकरच येणार आहे.'

यानंतर सोशल मीडियावरही लोकांनी या जोडप्याचे अभिनंदन करायला सुरुवात केली. यात कंडोम ब्रँड ड्युरेक्स देखील मागे राहिला नाही. त्यांनी रणबीर-आलियाचे एका मजेदार पोस्टद्वारे अभिनंदन केले. कंडोम कंपनीने ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. ड्युरेक्सने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर मजेशीर पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'महफिल में तेरी, हम तो क्लियरली नहीं थे'. रणबीर-आलियाचे लग्न झाले होते, तेव्हा ड्युरेक्सने एका मजेशीर पोस्टद्वारे या जोडप्याला वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या. आलिया भट्टच्या या गुड न्यूजवर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स शेअर करत आहेत.

Here's A Look At Durex's Post After The Pregnancy Announcement:

 

View this post on Instagram

 

A post shared by Durex India (@durex.india)

Here's A Look At  Durex's Post When They Got Married:

 

View this post on Instagram

 

A post shared by Durex India (@durex.india)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)