Sai Dharam Tej Accident: टॉलीवुड अभिनेता साई धरम तेज रस्ते अपघातात गंभीर जखमी
Sai Dharam Tej | (Photo Credits: Facebook)

प्रसिद्ध तेलुगू अभिनेते साई धरम तेज (Sai Dharam Tej) शुक्रवारी (10 ऑगस्ट) रात्री रस्ता अपघातात गंभीर जखमी झाले. प्राप्त माहतीनुसार, स्पोर्ट्स बाइक (Sports Bike) चालवताना त्यांचा त्यांची बाईक चिखलात अडकली. ही घटना हैदराबाद (Hyderabad) येथील दुर्गमचेरुवू केबल ब्रिज (Inaccessible Cheruvu Cable Bridge) नजीक घडली. अपघात होताच साई धरम तेज बेशुद्ध झाले. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. 34 वर्षीय साई यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे.

साई धरम तेज हे सुपरस्टार चिरंजीवी यांचे भाचे आहेत. तेज यांच्या टीमने प्रतिक्रिया दिली आहे. यात म्हटले आहे की, 'साई धरम तेज यांची प्रकृती ठिक आहे. तसेच, उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे. सध्या डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. त्यांची प्रकृती स्थिर झाली की पुढील उपचारासाठी त्यांना अपोलो रुग्णालयात घेऊन जाण्यात येईल.'

ट्विट

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, 'स्पोर्ट बाईक चालवताना साई धरम तेज यांनी हेल्मेट वापरले होते तसेच कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे सेवन केले नव्हते. त्यांची बाईक रस्त्यावर असलेल्या चिखलात अडकली. त्यांची प्रकृती धोकादायक स्थितीतून बाहेर आहे. तसेच, उपचारांनाही प्रतिसाद देत आहे.' (हेही वाचा,  Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेला अटक होणार? ठाणे कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला, 'ती' वादग्रस्त पोस्ट भोवण्याची शक्यता)

ट्विट

दरम्यान, अपघातानंतर साई धरम तेज (Sai Dharam Tej) यांची काही छायाचित्रेही इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. ज्यात त्यांच्या डोळा आणि छातीवर गंभीर जखमा झाल्याचे दिसत आहे. धरम तेज यांच्या अपघाताची बामती कळताच त्यांच्या कुटुंबातील सदस्य भाई वैष्णव तेज, अंकल पवन कल्याण, कजिन वरुण तेज, निहारिका कोनिडेला आणि त्यांचे मित्र संदीप किशन त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.