Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेला अटक होणार? ठाणे कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला, 'ती' वादग्रस्त पोस्ट भोवण्याची शक्यता
Ketaki Chitale (Photo Credit: Twitter)

मराठी मनोरंजन विश्वातील चर्चित अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) नेहमीच आपल्या बेधक आणि बेताल वक्तव्यांमुळे प्रकाशझोतात असते. मात्र, या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच केतकीच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिने गेल्या वर्षी 1 मार्च 2020 रोजी एक पोस्ट केली होती. केतकीच्या वक्तव्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून तिच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ठाणे कोर्टाने (Thane Court) तिचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला आहे. यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे

दरम्यान, केतकीने केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “नवबौद्ध,6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके व्यस्त आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असआपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते. हे देखील वाचा- गणेशोत्सवासाठी सोहेल खान याच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी रितेश- जेनेलिया देशमुख यांची उपस्थिती

केतकी चितळेची पोस्ट-

केतकीच्या या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. तसेच तिच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला होता. याचदरम्यान, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांच्या तक्रारीनंतर केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता ठाणे कोर्टाने देखील तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. हे प्रकरण साधारण वर्षभरापूर्वीचे असले तरी आता अभिनेत्रीवर अटकेची टांगती तलवार आहे.