Tiger Shroff New House: अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईच्या पॉश परिसरात 31 कोटींमध्ये खरेदी केले तब्बल 8 BHK घर; जाणून घ्या काय आहेत सुविधा
Tiger Shroff (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे सध्या त्यांच्या नवीन घरामुळे चर्चेत आहेत. माध्यमांमध्ये बातम्या आहेत की, टायगर श्रॉफने नुकतेच मुंबईत 8 बीएचके घर खरेदी केले आहे. टायगर श्रॉफची बहीण कृष्णा हिने ही माहिती दिली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब आपल्या नवीन घरात शिफ्ट झाले आहे. पूर्वी टायगर श्रॉफचे कुटुंब राहत असलेले घर भाड्याचे होते. टायगर श्रॉफने हे घर मुंबईच्या खार पश्चिम येथील रुस्तमजी पॅरामाउंट येथे घेतले आहे, ज्याची गणना शहरातील एका सर्वात महागड्या परिसरामध्ये केली जाते.

या घरात टायगरसोबत त्याचे पालक जॅकी श्रॉफ, आयशा श्रॉफ आणि बहीण कृष्णा श्रॉफदेखील राहणार आहेत. कृष्णाने सांगितले की, आपले कुटुंब तीन आठवड्यांपूर्वी या घरात शिफ्ट झाले. यासाठी एक छोटी आणि अत्यंत खाजगी पूजा ठेवण्यात आली होती. घरातील इंटेरियर टायगरची आई आयशा श्रॉफने डिझाइन केले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांना तीन ते चार महिने लागले. कृष्णाने असेही सांगितले की, या घरात प्रवेश करणारी ती पहिली सदस्य होती.

टायगर श्रॉफचे नवीन घर हे अगदी स्वप्नातील घरासारखे आहे, ज्यामध्ये अनेक सुविधा आहेत. ज्यात आउटडोअर फिटनेस स्टेशन, डेक, जिम, गेम रूम, स्विमिंग पूल सारख्या गोष्टींचा समावेश आहे. हे घर साधारण 31 कोटी रुपयांमध्ये खरेदी गेले असल्याच्या बातम्या आहेत. टायगर व्यतिरिक्त, या परिसरात राहणाऱ्या इतर प्रसिद्ध व्यक्तींमध्ये राणी मुखर्जी, हार्दिक पंड्या, कुणाल पंड्या, मेघना घई पुरी, दिशा पटानी यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Shah Rukh Khan ठरला जगात सर्वाधिक मागणी असलेला अभिनेता; Allu Arjun, Priyanka Chopra Jonas यांच्या नावाचाही समावेश (See List)

दरम्यान, टायगर श्रॉफने 2014 मध्ये ‘हिरोपंती’ या अॅक्शन चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर, बाघी (2016), बाघी 2 आणि वॉर (2019) अशा चित्रपटांद्वारे त्याला व्यावसायिक यश मिळाले.