कतरिना कैफने सुरैय्या गाण्यातील डान्ससाठी अशी केली तयारी ; पाहा व्हिडिओ
कतरिना कैफ (Photo Credits: Instagram)

'चिकीनी चमेली,' 'कमली,' 'शीला की जवानी' आणि 'काला चश्मा' या गाण्यातील धमाकेदार डान्सनंतर अभिनेत्री कतरिना कैफच्या हटके डान्सने नटलेले नवे गाणे सुरैय्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील या गाण्यातील जबरदस्त डान्सने कतरिनाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या गाण्यात कतरिनाचा हॉट अवतार पाहायला मिळतो. त्यातच तिचे हटके डान्स मुव्ह्ज आणि दिलखेचक अदांचा जलवा यात पाहायला मिळत आहे.

सुरैय्या गाणे प्रदर्शित झाल्यानंतर कतरिनाने आज या गाण्याचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत कतरिना सुरैय्या गाण्यावरील डान्सचा सराव करतना दिसत आहे. व्हिडिओत आमिर खान आणि प्रभुदेवाही आहेत.

व्हिडिओ पाहुन डान्ससाठी कतरिनाने घेतलेल्या मेहनतीचा प्रत्यय येतो. हा व्हिडिओ शेअर करत कतरिनाने लिहिले की, ''प्रभुदेवा यांच्यासोबत हुक स्टेपचा सराव करताना खूप मज्जा आली.''

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमात कतरिना कैफ, आमिर खान यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यशराज फिल्म्स निर्मित ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमाचे दिग्दर्शन विजय कृष्णा आचार्य यांनी केले आहे. हा सिनेमा 8 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.