Thugs of Hindostan चे हटके प्रमोशन ; Google Map वर आमिर खान होणार वाटाड्या
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चे प्रमोशन (संग्रहीत प्रतिमा)

सिनेमे निवडण्यात आमिर खान जितका चोखंदळ आहे. तितक्याच हटके आयडिया तो सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापरत असतो. सिनेमाला यश मिळण्यासाठी त्याचे प्रमोशन होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाचे आमिर खान खास पद्धतीने प्रमोशन करत आहे.

आमिर खान लवकरच गुगल मॅपवर अवतरणार आहे. आमिर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये 'फिरंगी भल्ला' ही भूमिका साकारत आहे. आता त्याचे हे पात्र गुगल मॅपवर दिसणार आहे. आता गुगल मॅपवर 'फिरंगी भल्ला' तुम्हाला वाट दाखवणार आहे. अॅन्ड्राईड किंवा आयओएस स्मार्टफोनवर हा फिरंगी भल्ला तुमचा वाटाड्या होईल. यात तो गाढवावर बसून प्रवास करताना दिसेल.

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 8 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन ही जोडी या सिनेमातून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यांच्यासोबत कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळाली. तर सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.