Amitabh Bachchan On New Year: 2020 वर्ष अत्यंत विचित्र; मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये चांगले अनुभव येतील - अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन (Photo Credits: Instagram)

Amitabh Bachchan On New Year: बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नवीन वर्षानिमित्त कोणतीही संकल्प केलेला नाही. यासंदर्भात भावना व्यक्त करताना त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, "2020 या संपूर्ण वर्षानंतर हे लिहिणं अत्यंत वाईट वाटत आहे की, गेलेले वर्ष खूप विचित्र होते आणि पुढचे वर्षदेखील विचित्र असू शकते. परंतु हो, मागील वर्षाच्या तुलनेत 1.1.21 वर्षात काही चांगले अनुभव येतील. ही त्याची एक झलक आहे. ही भावना प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणारी असून कदाचित ते एक उत्कृष्ट वर्ष असल्याचे देखील लक्षण आहे. "

यासंदर्भात पुढे अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे की, "कोणताही निश्चय केलेला नाही. ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, त्या चांगल्या रीतीने केल्या पाहिजेत. नित्यक्रमात कोणताही बदल होऊ नये. आशावादी रहा, आनंद पसरवा आणि लोकांची काळजी घ्या." (हेही वाचा -  Hrithik Roshan ने न्यू ईयर सेलिब्रेशनमध्ये Mika Singh च्या गाण्यावर ठरला ठेका; पहा Viral Videos)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्संना नवीन वर्षासाठी शांतता, प्रेम आणि सौहार्दाचा संदेश दिला आहे. खरं तर 2020 हे वर्ष अमिताभ यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी काळजीचं ठरलं असंचं म्हणावं लागेल. कारण, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना 2020 या वर्षांत कोरोना विषाणूचं संक्रमण झालं होतं. मात्र, या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.