Hrithik Roshan ने न्यू ईयर सेलिब्रेशनमध्ये Mika Singh च्या गाण्यावर ठरला ठेका; पहा Viral Videos
Hrithik Roshan (Photo Credits: Instagram)

2020 या कठीण वर्षानंतर 2021 चे स्वागत सर्वांनी अगदी जंगी केले आहे. न्यू ईयर सेलिब्रेशनचे (New Year Celebration) बॉलिवूड सेलिब्रिटींचे प्लॅन्स काही औरच असतात. प्रत्येकजण आपल्या स्टाईलने नववर्षाचे स्वागत करतात. बॉलिवूडचा हँडसम हँक  हृतिक रोशन (Hrithik Roshan) ने देखील न्यू ईयर सेलिब्रेशनचा आनंद घेतला. या सेलिब्रेशनचा एका व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात हृतिक रोशन गायक मीका सिंह (Mika Singh) च्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हृतिक चा डान्स म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हृतिक च्या या डान्सने चाहते सुखावले आहेत. हृतिक चे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. एका व्हिडिओत हृतिक मिक्का सिंगच्या 'तू मेरे अगल बगल है' हे गाण्यावर आपल्या मित्रपरिवारासह गरबा स्टाईल डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत 'कहो ना प्यार है' सिनेमातील 'एक पल का जीना' गाण्यावर नृत्य करत आहे. अधूनमधून त्याच्या आवाजातही हे गाणे ऐकायला मिळते. (Happy New Year 2021: अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सारा अली खान यांच्या सह 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींजनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!)

पहा व्हिडिओज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Mika Singh (@mikasingh)

(हे देखील वाचा: Sonam Kapoor Passionate Kiss With Anand Ahuja: सोनम कपूर ने पती आहुजा सोबत किस करतानाचा फोटो शेअर करत दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!, See Post)

हृतिक लवकरच 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेला तामिळ सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. त्यात आर. माधवन ने प्रमुख भूमिका साकारली होती.