Sonam Kapoor Passionate Kiss With Anand Ahuja: सोनम कपूर ने पती आहुजा सोबत किस करतानाचा फोटो शेअर करत दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा! (See Post)
Sonam Kapoor and Anand Ahuja (Photo Credits: Instagram)

Sonam Kapoor Passionate Kiss With Anand Ahuja: सर्वत्र नववर्षाचा उत्साह आहे. नववर्षाच्या शुभेच्छा देत सर्वजण 2021 चं आपआपल्या स्टाईलने स्वागत करत आहेत. आतच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने पती आनंद आहुजा (Anand Ahuja) सोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनम आणि आनंद एकमेकांना पॅशनेटली किस (Kiss) करत आहेत. साधारणपणे सोनम आपल्या खाजगी गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत नाही. त्यामुळेच या फोटोतून सोनमचे नवे रुप चाहत्यांसमोर आले आहे. हा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हा खास फोटो शेअर करत सोनमने लिहिले की, "2021 मधील प्रवास मी माझ्या प्रेमासोबत आणि तुमच्या सोबत करण्यास तयार आहे. हे वर्ष प्रेम, कुटुंब, मित्र, काम, प्रवास, आधात्मिक विकास आणि अनेक गोष्टींनी भरलेले असावे. मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट काळाची खूप आतुरतेने पाहत आहे. खूप मेहनत करुया. जीवन मनसोक्त जगूया. अजिबात मागे वळून पाहायचे नाही." (Happy New Year 2021: अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सारा अली खान यांच्या सह 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींजनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!)

पहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

सोनमचा हा अंदाज आणि संदेश अगदी आगळावेगळा आहे. पोस्टमधील हटके फोटो, शब्द आणि अंदाज नक्कीच लक्ष वेधून घेतो. दरम्यान, सध्या सोनम कपूर आपल्या पतीसोबत लंडनमध्ये आहे. लवकरच ती दिग्दर्शक शोमे मखीजा यांच्या ब्लाईंड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.