हृदयस्पर्शी कथेतून नात्यांमधील भावना व्यक्त करणाऱ्या 'The Sky Is Pink' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (Video)
The Sky Is Pink (Photo Credits-YouTube)

बऱ्याच महिन्यांपासून दूर राहिलेले अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दमदार चित्रपटासह एन्ट्री करत आहेत. 'The Sky Pink' या आगामी चित्रपटामधून झळकणार आहे. यामध्ये प्रियंका चोप्रा हिच्या सोबत फरहान अख्तर (Farhan Akhtar) सुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. तर 'द स्काय इज पिंक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र प्रियंका आणि फरहान या दोघांची चित्रपटातील केमिस्ट्री ही संपूर्ण चित्रपट पाहिल्यावरच ठरवता येणार आहे.

प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरमधून एका कपलची 25 वर्षांची आयुष्याचा प्रवास दाखवला आहे. तसेच लपूनछपून प्रेमप्रकरण ते लग्न-मुलांपर्यंत या विविध घटनांवर आधारित कथा आहे. मात्र आयुष्यात अशी एक परिस्थिती येते की, त्यांच्या मुलीला एक आजार असून ती जास्त काळ जगू शकत नाही. तर तुम्हीच पहा या चित्रपटाचा शानदार ट्रेलर:

(प्रियांका चोप्रा हिचा साडीत हॉट डान्स; चाहते घायाळ Watch Video)

या चित्रपटाचे दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केले आहे. या चित्रपटाला नुकताच 44th टोरेंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड करण्यात आली होती. तर संपूर्ण एशियामधून या एकमात्र चित्रपटाची निवड करण्यात आहे. येत्या 11 ऑक्टोंबर रोजी प्रेक्षकांना द स्काय इज पिंक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.