प्रियांका चोप्रा हिचा साडीत हॉट डान्स; चाहते घायाळ (Watch Video)
Priyanka Chopra (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिचा ग्लॅमरस अंदाज नेहमीच तिच्या चाहत्यांना भावतो. सोशल मीडियावर प्रियांका भलतीच अॅक्टीव्ह असून प्रत्येक पार्टी, इव्हेंटचे फोटोज ती शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. इनस्टाईल मॅगझीनच्या फोटोशूट दरम्यानचा हा व्हिडिओ असून त्यात प्रियांकाने साडी नेसली आहे. मात्र त्यातील तिचा हॉट अंदाज आणि दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. (प्रियांका चोप्रा हिचा निक जोनस सोबतचा रोमँन्टिक Kissing व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

या व्हिडिओत प्रियांका चोप्राचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा बॅकलेस लूक अनेकांना आवडला असला तरी काही युजर्सने तिला यावरुन ट्रोलही केले आहे. मात्र व्हिडिओतील तिचा डान्स लक्षवेधी आहे. (प्रियांका चोप्रा मेट गाला मधील लूकवरुन सोशल मीडियात ट्रोल)

पहा व्हिडिओ:

 

लवकरच प्रियांका चोप्रा 'द स्काय इज पिंक' या सिनेमात झळकेल. या सिनेमात फरहान अख्तर, जायरा वसीम यांच्या प्रमुख भूमिका असून या सिनेमाचे दिग्दर्शन शोनाली बोस करत आहे.