प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांच्या फोटोंमुळे सध्या सोशल मीडियात दोघांच्या चर्चा खुप रंगतात. तसेच प्रियांका प्रत्येकी वेळी पती निक जोनसच्या लहानसहान गोष्टींबद्दलचे कौतुक सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असते. तर नुकताच लास वेगस येथे आयोजित करण्यात आलेल्या बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्सला (Billboard Awards) प्रियांका आणि निक यांनी उपस्थिती लावली होती.
या अवॉर्ड सोहळ्यासाठी प्रियांका आणि निकचा लूक अप्रतिम दिसून आला. त्यावेळी प्रियांकाने व्हाईट रंगाचा ड्रेस घातला असून त्याला शोभेल अशी टिफनी एन्ड कंपनीची डायमंड ज्वेलरी घातलेली दिसून आली. तर प्रियांकाचा ज्वेलरी मधील हा ब्रँन्ड सर्वात आवडता असल्याचे म्हटले आहे. प्रियांका आणि निकचे अवॉर्ड्स सोहळ्याचे फोटोसह त्यांच्या दोघांचा रोमँन्टिक किंसिंगचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.(प्रियांका चोप्रा हिने पोस्ट केला Bathtub मधील हॉट फोटो, निकला उत्तम पती म्हणाली)
Nick and Priyanka! 🥰 #BBMAs pic.twitter.com/V9HQ5kcCoU
— jonas news. (@JonasConcerts) May 2, 2019
सध्या प्रियांका स्काई इज पिंक या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये वस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर मुख्य भुमिकेत दिसून येणार असून 11 ऑक्टोंबर 2019 रोजी प्रेक्षकांना सिनेमागृहात हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.