Badhaai Do: राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ चित्रपटाचे शूटिंग लवकरचं सुरू होणार
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर (Image Credit: Instagram)

Badhaai Do: राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 'बधाई हो' (Badhaai Ho) नंतर निर्माते या फ्रेंचायझीचा दुसरा भाग घेऊन येत आहेत. ज्याचे शीर्षक 'बधाई दो' (Badhaai Ho) असं आहे. हा एक फॅमिली कॉमेडी चित्रपट असणार आहे. तथापि, या चित्रपटात आयुष्मान खुरानाच्या जागी राजकुमार राव (Rajkummar Rao) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्यांच्यासोबत भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. या वर्षी निर्मात्यांनी मार्चमध्ये चित्रपटाचे स्टारकास्ट आणि शीर्षक जाहीर केले होते. या चित्रपटाचे शूटिंग जूनमध्ये सुरू होणार होते. मात्र, कोरोना विषाणूमुळे चित्रपटाचे शूटिंगही पुढे ढकलले गेले. परंतु, आता या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी पूर्ण झाली असून लवकरचं बधाई दो चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यापासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. सर्वोत्कृष्ट जाहिरात निर्माता आणि हंटर चित्रपटाचे दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, या फ्रेंचायझीचा भाग झाल्याने मला खूप आनंद होत आहे. हा कौटुंबिक करमणूक करणारा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग जानेवारीपासून सुरू होईल. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री Kangana Ranaut आणि बहिण Rangoli Chandel यांची समस्या वाढली, मुंबईत देशद्रोहच्या विविध कलमाअंतर्गत FIR दाखल)

बधाई दो चित्रपटात राजकुमार पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचे पात्र दिल्ली पोलिसांचे आहे. ज्याची ड्युटी महिला पोलिस ठाण्यात दाखवण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात तो एकमेव पुरुष पोलिस असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय भूमी पेडणकर शाळेत काम करणाऱ्या पीटी शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत.

दरम्यान, राजकुमार राव यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, त्याचा 'छलांग' हा चित्रपट दिवाळीनिमित्त प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले असून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तो प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमात नुसर भरूचा राजकुमार राव सोबत दिसणार आहे. यात राजकुमार राव पीटी शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.