The Life After Life: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी मृत्यूनंतर अवयव दान करण्याचे घेतला निर्णय; पाहा संपूर्ण व्हिडिओ
Riteish Deshmukh and Genelia Deshmukh (Photo Credit: Twitter)

सध्याच्या अवयवदान चळवळीमुळे आपण एका चांगल्या प्रगतीकडे जात आहोत. समाजात माणुसकी, आपलेपणा अद्यापही टिकून असल्याचे यातून पहायला मिळत आहे. ज्या व्यक्तीला आपण आयुष्यात कधी पाहिले नाही, त्या व्यक्तीला आपल्या जवळच्या व्यक्तीचे अवयव दान करण्यासाठी मन ही मोठे लागते. एकेक करीत असेच आतापर्यंत गेल्या चार ते पाच वर्षांत अवयवदानाची संख्या वाढू लागली आहे. अनेकांना जीवदान मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनेलिया (Genelia Deshmukh) यांनी मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जगात अवयव दान करणे, यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कोणतीच असू शकत नाही, असाही संदेश त्यांनी आपल्या चाहत्यांसह सर्वांनाच दिला आहे.

देशात अवयवदानात महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्लीसारख्या राज्यांनी आघाडी घेतली आहे. अवयवदान चळवळीला ‘अच्छे दिन’ आले असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही वर्षांत अवयवदान चळवळ वाढू लागली आहे. यातच रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. मी आणि जेनेलिया आम्ही दोघांनी गेल्या काही दिवसांपासून आपले अवयव दान करण्याबाबत अनेकदा विचार केला. मात्र, आज अखेर आम्ही दोघांनी या निर्णयावर ठाम निर्णय घेतला आहे. जगात अवयव दान करण्यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट नाही. आपण सर्वांना या महान कार्यात सामील व्हा. तसेच ‘द लाइफ आफ्टरलाइफ’चा भाग बना, असे आवाहन रितेश देशमुख यांनी केले आहे. हे देखील वाचा- दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या दंडावरील 'या' टॅटू ने सांगितला जीवन जगण्याचा महत्त्वाचा मूलमंत्र, Watch Photo

रितेश देशमुख यांचे ट्विट-

कल्याण येथे एक आठवड्यापूर्वी एका 61 वर्षाच्या महिलेने मृत्यूपश्चात केलेल्या यकृतदानाममुळे 64 वर्षाच्या नागरिका जीवदान मिळाले आहे. यामुळे डाक्टर आणि जीवदान मिळालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी मृत महिलेचे मनापासून आभार मानले आहेत. तसेच ही गोष्ट समाजातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.