दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या दंडावरील 'या' टॅटू ने सांगितला जीवन जगण्याचा महत्त्वाचा मूलमंत्र, Watch Photo
Rohit Shetty (Photo Credits: Yogen Shah/Instagram)

सध्या सर्वत्र सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या, नेपोटिजम यांरख्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) च्या एका टॅटूने या सर्वांवर एक साध्यासरळ भाषेत उत्तर दिलं आहे. या टॅटूमध्ये (Tattoo)असा काही संदेश दिला आहे जो या अनेक चर्चांना उत्तर देईल. रोहित शेट्टी याने देखील दिग्दर्शनात उतरण्यासाठी बराच संघर्ष केला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टंटबाज आणि खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले एम.बी.शेट्टी रोहित शेट्टी यांचे वडिल होते. तरीही रोहित शेट्टी यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत हळूहळू कामात यशस्वी वाटचाल सुरु केली आहे आणि त्याचेच फळ म्हणून रोहित यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.

रोहित च्या दंडावर असलेल्या या टॅटूवर जीवन जगण्याचा आणि आपल्यावर टीका करणा-या लोकांना सडेतोड उत्तर देण्याचा महत्त्वाचा फंडा सांगितला आहे. Coronavirus मुळे 'सूर्यवंशी' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, दिग्दर्शक रोहित शेट्टी ने ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती

पाहा टॅटू:

 

View this post on Instagram

 

#ROHITSHETTY has a tattoo on his arm "ONLY GOD CAN JUDGE ME " . Success mantra for achievers #yogenshah

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

या टॅटूमध्ये असं लिहिलेलं आहे की 'केवळ देवच न्याय करु शकतो' (Only God Can Judge). हा खूपच चांगला संदेश आहे,

दिग्दर्शक रोहित शेट्टी च्या कामाविषयी बोलायचे झाले तर लवकरच त्याचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.