Loop Lapeta: तापसी पन्नू ने शेअर केले ‘लूप लपेटा’ चे पहिले पोस्टर; पहा फोटो
Looop Lapeta Poster (PC - Instagram)

Loop Lapeta: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या आगामी ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सध्या या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपट ‘लूप लपेटा’ (Looop Lapeta) चा पहिले पोस्टर शेअर केले आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर 'लूप लपेटा' ची पहिली झलक शेअर केली. ज्यामध्ये ती टॉयलेटमध्ये अगदी कूल लुकमध्ये बसलेली दिसत आहे.

पोस्टरमध्ये तापसी गलिच्छ वॉशरूममध्ये बसलेली दिसत आहे. बाथरूममध्ये डस्टबिन दिसत आहे. पोस्टर शेअर करण्याबरोबरचं तापसीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'जीवनात कधीकधी अशी वेळ येते जेव्हा आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, हे मी इथ का संपवलं? मी पण हाच विचार करत होते. या ठिकाणचा नाही, जीवनाबद्दलचा. तुमचं सर्वांचं वेड्या प्रवासात स्वागत.' (वाचा - Adipurush: प्रभास आणि सैफ अली खानच्या मेगा बजेट 'आदिपुरुष' चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात; अभिनेत्याने सोशल मीडियावर दिली माहिती)

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

दरम्यान, 'लूप लपेटा' एक कॉमेडी-थ्रिलर चित्रपट आहे. तापसीचा 'लूप लपेटा' हा 1998 मध्ये रिलीज झालेल्या जर्मन सुपरहिट क्लासिक 'रन लोला रन' चा हिंदी रिमेक आहे. ज्याचे दिग्दर्शन टॉम टायकर यांनी केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश भाटिया यांनी केलं आहे. या चित्रपटात तापसी पन्नू 'मर्दानी' फेम अभिनेता ताहिर राज भसीन यांच्यासोबत दिसणार आहे.