Tiger Nageswara Rao First Look: रवी तेजाच्या 'टायगर नागेश्वर राव' या चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; 20 ऑक्टोबरला हिंदीसह पाच भाषांमध्ये होणार प्रदर्शित
Tiger Nageswara Rao First Look (PC - You Tube)

Tiger Nageswara Rao First Look: तेलुगू सुपरस्टार रवी तेजा (Ravi Teja) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'टायगर नागेश्वर राव'चे (Tiger Nageswara Rao) पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन ड्रामा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड स्टार्सही दिसणार आहेत. या चित्रपटात नुपूर सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टायगर नागेश्वर राव हा चित्रपट एका प्रसिद्ध चोराचा बायोपिक आहे. या चित्रपटात रवी तेजाची वेगळी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील त्याची देहबोली, बोलण्याची पद्धत, कपडे घालण्याची पद्धत सर्व काही वेगळे असेल. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर लोकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. (हेही वाचा - Nitesh Pandey Passes Away: अनुपमा फेम अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 51 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

या चित्रपटाच्या टीझरला जॉन अब्राहमने आपला आवाज दिला आहे. जॉन अब्राहमचा दमदार आवाज या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये ऐकायला मिळणार आहे. रवी तेजा व्यतिरिक्त प्रवीण दाचाराम, रेणू देसाई, मांडवा साई कुमार आणि राजीव कुमार अनेजा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात 5 सुपरस्टार, तेलगूमधील व्यंकटेश, कन्नडमधील शिवा राजकुमार, हिंदीतील जॉन अब्राहम, तामिळमधील कार्ती आणि मल्याळममधील दुल्कर सलमान हे एकत्र येत आहेत. रवी तेजा टायगर नागेश्वर रावची भूमिका साकारणार आहे.