Nitesh Pandey Passes Away: अनुपमा फेम अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 51 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका करणारे अभिनेते नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचे मंगळवारी निधन झाले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पांडे यांचे वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Nitesh Pandey Passes Away: काही लोकप्रिय टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका करणारे अभिनेते नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचे मंगळवारी निधन झाले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पांडे यांचे वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नाशिकजवळील इगतपुरी येथे शूटिंग करत असताना ते कोसळले. त्यांच्या जाण्याने सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. यापूर्वी 'साराभाई व्हर्सेस साराभाई' अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली होती आणि आता नितीश पांडे यांच्या जाण्याने लोकांनाही धक्का बसला आहे. (हेही वाचा - Vaibhavi Upadhyaya Passes Away: 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांचा कार अपघातात मृत्यू)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 24, 2023 10:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

