Vaibhavi Upadhyaya Passes Away: 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांचा कार अपघातात मृत्यू
Vaibhavi Upadhyaya (PC- Instagram)

Vaibhavi Upadhyaya Passes Away: 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या शोमध्ये 'जास्मिन' ची भूमिका करणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय (Vaibhavi Upadhyaya) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती 32 वर्षांची होती. चंदिगड येथील त्यांचे कुटुंबीय त्यांचे पार्थिव मुंबईत आणत आहेत. वैभवी यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

साराभाई व्हर्सेस साराभाई टेक 2 या शोमध्ये वैभवीसोबत काम करणारे निर्माता-अभिनेता जेडी मजेठिया यांनी या बातमीला दुजोरा दिला. उपाध्याय यांची कार दरीत पडल्याचे त्यांनी सांगितलं आहे. मजेठिया यांनी सांगितले की, वैभवीचा मंगेतरही कारमध्ये होता, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Bengali Actress Suchandra Dasgupta Died: प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचा रस्ते अपघातात मृत्यू; 29 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

इंस्टाग्राम स्टोरीवरील एका पोस्टमध्ये त्यांनी ही घटना उत्तर भारतात घडल्याचे सांगितले. जेडी मजेठिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आयुष्य खूप अप्रत्याशित आहे. एक अतिशय चांगली अभिनेत्री, प्रिय मैत्रिण वैभवी उपाध्याय, जिला साराभाई विरुद्ध साराभाईची 'जस्मिन' म्हणून ओळखले जाते, त्यांचे निधन झाले. उत्तरेतील एका अपघातानंतर मुंबईत उद्या (बुधवारी) सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कारासाठी अभिनेत्रीचे कुटुंबीय तिचे पार्थिव आणणार आहेत. वैभवीच्या आत्म्याला शांती लाभो."

वैभवी 2020 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत 'छपाक' आणि 'तिमिर' (2023) या चित्रपटांमध्ये दिसली होती. टीव्ही शो 'साराभाई वर्सेस साराभाई' व्यतिरिक्त, उपाध्याय यांनी 'क्या कसूर है अमला का' आणि 'प्लीज फाइंड अटॅच्ड' या डिजिटल मालिकेतही काम केले.