संजय दत्त (Photo Credits : Instagram)

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) गेल्या काही दिवसांपूर्वी तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. स्वत: संजय दत्तने या संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. त्यानंतर कोकिलाबेन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी 61 वर्षीय संजय दत्तचे पॉझिट्रॉन इमिटेशन टोमोग्रफी स्कॅन झाले असून त्याच्या रिपोर्टमध्ये तो कर्करोगमुक्त असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संजय दत्त हा आपल्या आगामी चित्रपट पृथ्वीराज (Prithiviraj) आणि केजीएफ 2 (KGF Chapter 2) मध्ये झळकणार आहे. परंतु, संजय दत्त अद्यापही शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त न झाल्यामुळे त्याला अॅक्शन सीनसारखी काम करता येणार नाहीत. यामुळे प्रेक्षकांना संजय दत्तच्या या दोन्ही चित्रपटामधील अॅक्शन सीनपासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.

या दोन्ही चित्रपटात संजय दत्त अनोख्या भुमिकेत पाहायला मिळणार होता. या चित्रपटांत संजय दत्तचे अनेक अॅक्शन सीन असल्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता होती. परंतु, या दोन्ही चित्रपटातील अॅक्शन सीन कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहेत. यामुळे प्रेक्षक वर्गांमध्ये नाराजी पसरली आहे. संजय दत्तने कर्करोगावर जरी मात केली आहे. मात्र, शारीरिकदृष्ट्या सध्या तो कमकुवत आहे. त्यामुळे त्याला आरामाची गरज आहे. यासाठी चित्रपटातील त्याच्या अॅक्शन सीनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा-Mahesh Bhatt on Luviena Lodh's Allegations: सुनेने केलेल्या गंभीर आरोपांवर महेश भट्ट यांची प्रतिक्रिया; दिला कायदेशीर कारवाईचा इशारा (Watch Video)

 ऑगस्ट महिन्यामध्ये संजय दत्तला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. कर्करोगाच्या तिसऱ्या स्टेजमध्ये असलेल्या संजय दत्त यांच्यावर त्यानंतर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते.