#Thackeray Movie : ‘ठाकरे’ चित्रपटातील संवादामुळे दाक्षिणात्य (Tollywood) कलाकार नाराज
दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ आणि बाळासाहेंबाच्या भूमिकेतील नवाजुद्दीन सिद्दीकी | (Photo courtesy: archived, edited, symbolic images))

बहुचर्चित 'ठाकरे' (Thackeray Movie) चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला (Thackeray Movie Trailer) आणि चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली. त्यात हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकल्यामुळे ही उत्सुकता अधिकच वाढली. दरम्यान, या चित्रपटातील संवादावरुनही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या चित्रपटातील एका संवादावरुन टॉलिवूडमध्ये ( Tollywood - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी) नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. टॉलिवूडच्या काही कलाकारांनी ट्विटर आणि इतर सोशल मीडियातून तशी नाराजी व्यक्तही केली आहे.

शिवसेनेची स्थापना झाली आणि मुंबईत अल्पावधीत परप्रांतीयांना हटविण्यासाठी आंदोलनही सुरु झाले. हे आंदोलन प्रामुख्याने दाक्षिणात्य लोकांविरोधात होते. (आज हे आंदोलन हिंदी भाषीकांविरुद्ध असल्याचे पाहायला मिळते) हा चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांचे जीवनचरित्र आणि पर्यायाने शिवसेनेचा इतिहास दाखवणारा असल्याने सुरुवातीच्या काळातील दाक्षिणात्यांविरोधातील आंदोलनाची झलकही चित्रपटात पाहायला मिळते. या आंदोलनाच्या अनुशंघाने ‘उठाओ लुंगी, बजाओ पुंगी’अशा आषयाचा एक संवाद चित्रपटात आहे. याच संवादावर दाक्षिणात्य कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, फक्त 'ठाकरे'च! 25 जानेवारीला दुसरा कुठलाच सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही - शिवसेना नेता)

खास करुन प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ (Actor Siddharth) याने ट्विट करत चित्रपटातील संवादावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘हा संवाद दक्षिण भारतीयांविरोधात द्वेष पसरवणारा आहे. अशा द्वेष पसरवणाऱ्या चित्रपटाला तुम्ही प्रतिसाद देणार का,’ असा प्रश्नही सिद्धार्थ उपस्थित करतो.

दरम्यान, येत्या 25 जानेवारीला फक्त 'ठाकरे' सिनेमाच (Thackeray Movie) प्रदर्शित होईल. दुसरा कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा थेट धमकीवजा इशाराच शिवसेना चित्रपट सेनेचे (Shiv Sena Chitrapat Sena) सरचिटणीस बाळा लोकरे (Bala Lokare) यंनी दिला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.