Ganapath Teaser Date: डान्स आणि अॅक्शनसाठी प्रसिद्ध असलेला टायगर श्रॉफ (Tiger Shroff) पुन्हा एकदा चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'बागी' आणि 'स्टुडंट ऑफ द इयर 2' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अॅक्शन दृश्यांमुळे चर्चेत आलेला टायगर श्रॉफ आता 'गणपत - भाग 1' बनून सर्वांची हृदय जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख समोर आली आहे. 'गणपत- पार्ट 1' हा विकास बहल दिग्दर्शित चित्रपट असेल. टायगरचा रफ अँड टफ अवतार चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी समोर आला होता, ज्यामध्ये टायगर बॉक्सिंग मॅचच्या पार्श्वभूमीवर इंटेन्स लूक देताना दिसला होता. आता एक व्हिडिओ शेअर करून त्याने टीझरच्या रिलीजची तारीख वेगळ्या पद्धतीने उघड केली आहे.
अभिनेत्याने या चित्रपटासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने म्हटलं आहे की, तुम्हाला माझी आठवण आली का. इतके दिवस मी कुठे होतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बरं काहीतरी खास प्लॅनिंग करत होतो. असे काहीतरी जे तुम्हाला आणि मला जगाच्या शिखरावर घेऊन जाईल. जर ते शीर्षस्थानी असेल तर ते नक्कीच काहीतरी मनाला भिडणारे आहे, नाही का? चला हे जग बदलूया.' 'गणपत' चित्रपटाचा टीझर 27 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा - Bigg Boss 17 Promo: 'दिल दिमाग और दम का होगा ये गेम', सलमान खानने बिग बॉस 17 च्या प्रोमोमध्ये केला खुलासा, Watch Video)
Duniya Badal ne ke liye duniya ko badalna padta hai !
This one is for my fans ❤️#Ganapath in cinemas this Dussehra, 20th October#GanapathTeaserOn27thSept@SrBachchan @vashubhagnani @kritisanon @jackkybhagnani #VikasBahl @honeybhagnani @poojafilms #VirajSawant #GoodCo… pic.twitter.com/WFeMbJ09Qp
— Tiger Shroff (@iTIGERSHROFF) September 24, 2023
दरम्यान, 2020 मध्ये 'गणपत'चे मोशन पोस्टर रिलीज झाले होते. मात्र, त्यानंतर या चित्रपटाबाबत कोणतेही विशेष अपडेट मिळाले नव्हते. टायगर श्रॉफचा हा चित्रपट दसऱ्याला (20 ऑक्टोबर) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि क्रिती सेनॉन देखील दिसणार आहेत.