Bigg Boss 17 Promo: 'दिल दिमाग और दम का होगा ये गेम', सलमान खानने बिग बॉस 17 च्या प्रोमोमध्ये केला खुलासा, Watch Video

आगीतून बाहेर पडताना सलमान म्हणतो, 'आग से खिलाएंगे, धमाका करेंगे, दिल दिमाग और दम का होगा ये गेम, लेकीन ये गेम नहीं होगा सबके लिए एक समान. या खेळासाठी हृदय, मन आणि शक्ती आवश्यक असेल. पण हा खेळ सर्वांसाठी सारखा असणार नाही.

Bigg Boss 17 Promo: 'दिल दिमाग और दम का होगा ये गेम', सलमान खानने बिग बॉस 17 च्या प्रोमोमध्ये केला खुलासा, Watch Video
Bigg Boss 17 Promo (PC - Instagram)

Bigg Boss 17 Promo: बिग बॉस (Bigg Boss) या रिअॅलिटी शोच्या नव्या सीझनसह सलमान खान (Salman Khan) टेलिव्हिजनच्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवारी संध्याकाळी बिग बॉस 17 (Bigg Boss 17) चा नवीन प्रोमो (Promo) रिलीज झाला. त्यात सलमान बॉमसमोर बसलेला दिसत आहे. प्रोमो पाहून असं वाटतंय की यावेळी बिग बॉस धमाकेदार असणार आहे. बिग बॉस 17 च्या प्रोमोमध्ये सलमान एका बॉम्बसमोर बसला आहे आणि म्हणतोय, 'अरे, हा पण बॉम्ब आहे. सहभागी या पेक्षा जास्त स्फोटक असतील. दरम्यान, सलमान चुकीची वायर कापतो आणि बॉम्बचा स्फोट होतो. आगीतून बाहेर पडताना सलमान म्हणतो, 'आग से खिलाएंगे, धमाका करेंगे, दिल दिमाग और दम का होगा ये गेम, लेकीन ये गेम नहीं होगा सबके लिए एक समान. या खेळासाठी हृदय, मन आणि शक्ती आवश्यक असेल. पण हा खेळ सर्वांसाठी सारखा असणार नाही.

कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार्‍या 'बिग बॉस 17' चा नवीन प्रोमो रिलीज करताना निर्मात्यांनी प्रीमियरची तारीखही जाहीर केली आहे. बिग बॉस 17 चा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना त्याने लिहिले की, 'यावेळी परीक्षा प्रेमाची असेल, काही जिंकतील तर काही हारतील.' त्याचवेळी सलमान म्हणतो की, बिग बॉसमध्ये घरातील सदस्यांना प्रेमात कठीण परीक्षा द्याव्या लागतील. (हेही वाचा - Chandramukhi 2 Trailer: चंद्रमुखी 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सोशल मीडियावर रंगली चर्चा; पाहा धमाकेदार ट्रेलर)

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

हा शो 15 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजता सुरू होत आहे. OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर दर्शक 24 तास लाइव्ह पाहू शकतात. याशिवाय कलर्स वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवार-रविवार रात्री 9 वाजता प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल.

(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2023 01:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).