Chandramukhi 2 trailer

Chandramukhi 2 Trailer: अभिनेत्री कंगणा रनौत हीचा आगामी चित्रपट चंद्रमुखी २ चा पोस्टर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगणा रनौत हीचा नवीन लोक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांनी ट्रेलर पाहून चांगला प्रतिसाद दिला आहे. ट्रेलर पुर्वी या चित्रपटातील तीचा लूक सोशल मीडियावर रिलीज झाला होता. सोशल मीडियावर तीच्या नवी लुकची चर्चा होत होती. कंगना रनौतने 'चंद्रमुखी २'मधील तिच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी कंगनाने भारतीय शास्त्रीय नृत्याचेही प्रशिक्षण घेतले आहे.

ट्रेलर पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे. चाहत्यांनी ट्रेलर पाहून कंमेट देखील केली आहे. कंगनाचा लुक आणि अभिनय पाहून चाहते खुश झाले आहे.या चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार असल्याचे एका युजर्सने सांगितले आहे. या चित्रपटात कंगणा हीचा हॉरर लुक पाहायला मिळाला आहे. त्यामुळे भरपूर ड्रामाने भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजन करणार आहे.

२८ सप्टेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटात कंगनाचा एक वेगळ्या अवतार पाहण्यासाठी चाहत्यांना आतुरता लागली आहे. सोशल मीडियावर ट्रेलरची चर्चा रंगली आहे. लॉरेन्स रजनीकांतची भूमिका साकारत आहे.