Animal Teaser: रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाचा टीझर 'या' खास दिवशी होणार प्रदर्शित, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी केला खुलासा
Animal Teaser (PC - Instagram)

Animal Teaser: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर आणि संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांचा चित्रपट 'अ‍ॅनिमल' हा 2023 च्या सुरुवातीपासूनच बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक प्रदर्शित झाल्यापासून चाहते खूपच उत्सुक झाले आहेत आणि आता चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत आहेत. 28 सप्टेंबर रोजी रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाचा टीझर लाँच केले जाऊ शकते. ताज्या अपडेटनुसार, या चित्रपटाचा टीझर 28 सप्टेंबरलाच लॉन्च होईल.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रणबीर कपूरच्या वाढदिवसाला टीम अॅनिमलच्या टीझरचे अनावरण करणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती शेअर केली आहे. (हेही वाचा -Jawan Movie: शाहरुख खानच्या 'जवान'चा जगभरात डंका, लवकरच करु शकतो 1000 कोटींचा टप्पा पार)

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी चित्रपटाच्या कलाकारांमुळे बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट होण्याचा विश्वास व्यक्त केला होता. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या परंपरेप्रमाणे रणबीर कपूरच्या वाढदिवसाला अॅनिमलचा टीझर प्रदर्शित होईल का? असे भूषण कुमारला विचारले असता, भूषण कुमारने अप्रत्यक्षपणे असे संकेत दिले की, चाहते त्याची अपेक्षा करू शकतात. रणबीर कपूर या वर्षी 41 वर्षांचा होणार आहे आणि 'तू झुठी में मकर' नंतरचा 'अॅनिमल' हा त्याचा दुसरा रिलीज असेल.

चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी बोलताना भूषण कुमार म्हणाले, आम्ही खूप उत्सुक आहोत आणि प्रेक्षक माझ्यापेक्षा जास्त उत्सुक आहेत. या चित्रपटात सर्व काही आहे. तो पूर्ण मनोरंजन करणारा आहे. हा एक संपूर्ण भारतातील, संपूर्ण जगाचा चित्रपट आहे, जिथे नाटक, अॅक्शन, कथा, रणबीर कपूरचा अभिनय जबरदस्त आहे, जो यापूर्वी कधीही न पाहिलेला आहे. अनिल कपूर, बॉबी देओल आणि इतर सर्वांनी यात दमदार अभिनय केला आहे, त्यामुळे साहजिकच तुम्ही उत्साही असाल.

रणबीर कपूरसोबतच अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी 'अ‍ॅनिमल'मध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर रक्तात भिजलेल्या आणि उग्र स्टाईलमध्ये दिसत आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.