Tara Sutaria Tested COVID19 Positive: देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत तुफान वाढ होत आहे. अशातच काही बॉलिवूड कलाकारांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. रणबीर कपूर, संजय लीला भंसाली, मनोज बाजपेयी यांच्यासह आता तारा सुतारिया हिला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. तर तारा हिचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.(Twinkle Khanna ने पती Akshay Kumar सोबतचा फोटो शेअर करुन तमाम जोडप्यांना दिला घटस्फोट न होण्याचा मूलमंत्र)
फिल्मफेअरच्या एका रिपोर्ट्सनुसार, तारा सुतारिया हिला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. नुकतीच तारा हिने आपला आगामी चित्रपट तडप चे शुटिंग पूर्ण केले आहे. यामध्ये तारासह मुख्य भुमिकेत आहान शेट्टी सुद्धा दिसून येणार आहे. हा चित्रपट येत्या 24 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.(Manoj Bajpayee Tested COVID-19 Postive: कोरोना करतोय बॉलिवूडकरांचा पाठलाग! रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी पाठोपाठ मनोज वाजपेयीला देखील कोरोनाची लागण)
View this post on Instagram
तडप चित्रपट हा लव्ह स्टोरीवर आधारित आहे. याचे पोस्टर शेअर करताना ताराने चित्रपटाबद्दल सांगितले होते. ताराने पोस्ट करत असे म्हटले होते की, हा चित्रपट येत्या 24 सप्टेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे. यामध्ये अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तर अक्षय कुमार याने सुद्धा चित्रपटाचे पोस्टर शेअर करत तारा आणि आहान यांना शुभेच्छा दिल्या होत्या.