Tanuja's 75th Birthday: आई तनुजा हिच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री काजोलने दिले असे काही गिफ्ट जे पाहून तुमचेही डोळे पाणावतील, Watch Video
Tanuja 75th Birthday (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड जगताचा एक काळ गाजवलेली ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांचा आज 75 वा वाढदिवस. आज जरी अभिनेत्री काजोलची (Kajol) आई अशी त्यांची ओळख असली तरीही त्यांना हिंदी सिनेसृष्टीत अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले होते. 1950 मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमधील फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 1960 मध्ये त्यांना 'छबीली' (Chabili) या चित्रपटातून पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणा-या आपल्या लाडक्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री काजोल देवगण ने असे काही गिफ्ट दिले जे पाहून कोणाचेही डोळे पाणावतील.

हे गिफ्ट म्हणजे आपल्या आईचा म्हणजेच तनुजाचा गेल्या 75 वर्षांचा प्रवास फोटोंच्या माध्यमातून काजोलने मांडला आहे. आपल्या कुटूंबाचे आईसोबतचे गोड क्षण तसेच तिची बॉलिवूडमधील कारकिर्द या फोटोंमध्ये झळकते आहे.

हेही वाचा-  शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच समोर आला तनुजा यांचा फोटो; आजारामुळे ओळखणेही झाले कठीण, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिने ही गिफ्ट शेअर करून आपल्या आईचं कौतुक केलय. तसेच 'ही ती स्त्री आहे जिने मला सुपरवुमन मधलं सुपर गोष्ट कशी शोधावी हे शिकवलं' असं काजोलने या पोस्टखाली लिहिले आहे.

बॉलिवूड बबलने दिलेल्या वृत्तानुसार तनुजा यांना डायव्हर्टिक्युलायटीस (Diverticulitis) हा आजार झाला होता हे सांगण्यात आले होते. यासाठीच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर पहिल्यांदाच काजोलने आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तनुजाला ओळखणेही अवघड झाले होते.

त्यानंतर 22 सप्टेंबरला 'बालिका दिना' निमित्त आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यात तनुजा यांची प्रकृतीत अत्यंत खालावलेली दिसत आहे. मात्र त्यांचा हसरा चेहरा आणि त्यांचा उत्साह हा चाहत्यांना खूपच भावूक करणारा असा आहे.